मुंबई: काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह 7 ते 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी संदीप देशपांडे यांना अटक करण्यात आलं आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं.

फेरीवाल्याच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद उफाळला आहे.

https://twitter.com/abpmajhatv/status/936529709235453957

LIVE UPDATE




  • मनसेचं काय चुकलं? शिवाय बदल्याची भाषा करणारी मुंबई काँग्रेस महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार विसरली काय? तसंच मनसेविरुद्ध बांगड्या दाखवणं हा महिलांचा अपमान नाही का? - नितेश राणे


https://twitter.com/NiteshNRane/status/936552250541072384

  • काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा, गुरुदास कामत यांची मागणी

  • हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, 6 जणांना ताब्यात घेतलं आहे, कडक कायदेशीर कारवाई करु : मुंबई पोलीस

  • मनसेकडून मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, सीसीटीव्ही फुटेज समोर


https://twitter.com/MumbaiPolice/status/936498455723118592

https://twitter.com/sachin_inc/status/936495099625709568

मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची आज सकाळीच नासधूस करण्यात आली. मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे

आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या.

काँग्रेसची मनसेविरोधात घोषणाबाजी

मनसेच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसने मनसेविरोधात घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर त्यांनी मनसेचे झेंडे जाळून निषेध व्यक्त केला.

संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.  पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

दरम्यान ह्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी, तोडफोड किंवा मारहाण करुन नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निषेध

या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच हल्लेखोरांना तातडीने अटक करुन, मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड !: विखे पाटील

मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असं विखे म्हणाले.

संबंधित बातम्या

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे 

मनसेच्या भित्र्या, नपुसंक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम