मुंबई: मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.  पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर संजय निरुपम चांगलेच आक्रमक झाले आहेत.

संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला.

संजय निरुपम म्हणाले, "मी मनसेचा हताशपणा समजू शकतो. त्यांचे कार्यकर्ते फेरीवाल्यांकडून मार खात आहेत. मनसेचा आमच्या कार्यालयावरील हल्ला हा भ्याड आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्हीही प्रत्युत्तर देऊ"

https://twitter.com/sanjaynirupam/status/936488770441961472

https://twitter.com/sanjaynirupam/status/936490377766305792

मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची आज सकाळीच नासधूस करण्यात आली. मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे

आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या.


तीन मनसे कार्यकर्ते ताब्यात

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

काँग्रेसची मनसेविरोधात घोषणाबाजी

मनसेच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसने मनसेविरोधात घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर त्यांनी मनसेचे झेंडे जाळून निषेध व्यक्त केला.

https://twitter.com/abpmajhatv/status/936503069868679170

संबंधित बातम्या

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे