या प्रकरणी नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन आठवड्यात दोन वेळा त्यांच्या गुन्हा दाखल झाला आहे.
रमेश कदम सध्या भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जेलमधील एका पोलिस कॉन्टेबलने शुक्रवारी सकाळी रमेश कदम यांना त्यांच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाताना पाहिलं. परत येण्यास सांगितलं असता कदमांचा पारा चढला आणि पोलिसाला शिवगाळ केली.
यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी रमेश कदमांवर एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
आमदार रमेश कदमांची मुजोरी कायम, पोलिसांना शिवीगाळ
याआधी 19 मे रोजी ड्यूटीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ केल्याचा रमेश कदम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात गुरुवारी आणलं होतं. मात्र, कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हतं. या वेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचे म्हणणे लिहून घेण्यास सांगितल्यानंतर कदमांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी पोलिस अधिकारी मनोज पवार यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आलं.
काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.
– कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
– उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं
– नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
– अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या
– लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
– महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले
– विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप
19 मे रोजीचा व्हिडीओ