सप्टेंबरपासून मुंबईची एसी लोकल रुळावर!
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 05 Jun 2017 11:17 PM (IST)
मुंबई : आतापर्यंत फक्त एसी लोकल प्रवासाचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक गारेगार बातमी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून मुंबईच्या उपनगरीय पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या एसी लोकलची चाचणी सुरू असून, सप्टेंबरपर्यंत एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. तांत्रिक कारणास्तव एसी लोकल मध्य रेल्वेवर धावू शकत नाही. त्यामुळे ती पश्मिम रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रत्नागिरीत 2019 पर्यंत रेल्वे कारखाना मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी 10 एसी लोकल लवकरच सेवेत दाखल होणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान एसी लोकलचं भाडं किती असणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. याशिवाय 2019 पर्यंत रत्नागिरीत रेल्वे कारखानाही सुरू करण्यात येणार आहे.