त्यात भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मोदींना विष्णुचा अकरावा अवतार म्हटलं. त्यामुळे सोशल मीडियावर अवधूत वाघ यांच्यासह मोदींवरही पुन्हा टीका सुरु झाली. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी विडंबनात्मक आरती तयार करुन गायली आहे.
“आज फेसबुक बघत असताना अचानक विमानावर स्वार मोदींचा विष्णूच्या अकराव्या अवतरातला फोटो पहिला. कल्की अवतारानंतर भगवान विष्णू मोदींच्या रूपात अवतरल्याचा साक्षात्कार काल भाजपच्या एका प्रवक्त्यांना झाला. आता देव आहेच म्हटल्यानंतर वाहन, मंदीर, आरती सोपस्कार आलेच. याबद्दलच विचार करत असतांना या नव्या देवाची आरती रचण्याचा हा छोटासा प्रयत्न.” असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विडंबनात्मक आरतीचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी तयार केलेली विडंबनात्मक आरती :
“येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!
अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!!
अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी !
डसाल्ट कंपनीचे तयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी।
दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!
येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!”
व्हिडीओ :