भिवंडी : भिवंडी शहरात दररोज भिवंडीकरांना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याचा फटका शिवसेनेच्या आमदाराला देखील बसला आहे. शिवसेनेच्या एका कार्यक्रमासाठी निघालेले शिवसेनेचे विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे यांना खड्ड्यांमुळे झालेल्या रहदारीचा फटका बसला. त्यांना ट्रॅफिक जॅम झाल्याने गाडी सोडून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पायपीट करावी लागली.
भिवंडीकरांना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे अनेक आजारांना भिवंडीकर सामोरे जात आहेत. मात्र या सर्व बाबींकडे महापालिका आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसतात. कारण त्यांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी व त्रासाची जाणीव होत नसेल. मात्र योगायोगाने आज लोकप्रतिनिधीच याचा फटका बसल्याने याची चर्चा होत आहे.
शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी आमदार म्हात्रे हॉटेलच्या दिशेने निघाले. मात्र खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत म्हात्रे अडकले. बराच वेळ झाला गाडी काही पुढे सरकत नसल्याने रुपेश म्हात्रे यांनी हॉटेलपर्यंतची वाट पायीच गाठली.
याबाबत त्यांना विचारले असला आमदार म्हात्रे यांनी आचारसंहितेचे कारण देत काहीही बोलण्यास नकार दिला.
भिवंडी शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे अनेक आजारांना नागरिक समोरे जात आहेत. शहरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उभा आहे. पंधरा मिनिटांचा रस्ता कापण्यासाठी एक ते दोन लागतो. पायी प्रवास करत असताना आमदार महोदयांना जो त्रास सहन करावा लागला तो त्रास भिवंडीकर दररोज सहन करतात, अशा नागरिकांच्या भावना आहेत.
खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत आमदार अडकले, करावा लागला पायी प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2019 07:34 PM (IST)
या सर्व बाबींकडे महापालिका आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसतात. कारण त्यांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी व त्रासाची जाणीव होत नसेल. मात्र योगायोगाने आज लोकप्रतिनिधीच याचा फटका बसल्याने याची चर्चा होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -