कर्जमाफीच्या कामात चुका तर होणारच : सहकारमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2017 07:35 AM (IST)
बँक, आयटी विभागांना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असून रक्कम बँकांना वर्ग केली जाईल, असंही सुभाष देशमुख म्हणाले.
मुंबई : कर्जमाफीसारख्या योजनेचं काम करताना चुका तर होणारच, असं अजब विधान करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांनी दिलेल्या यादीत एकच खातं किंवा आधार कार्डावर शेकडो शेतकरी लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे. बँकांकडून सरकारला ही माहिती मिळाली आहे. पती किंवा पत्नीच्या नावावर एकच आधार कार्ड असल्याचं समोर आलं आहे, असं देशमुखांनी सांगितलं. बँक, आयटी विभागांना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असून रक्कम बँकांना वर्ग केली जाईल, असंही सुभाष देशमुख म्हणाले. कर्जमाफीसंदर्भात बिनचूक माहिती असलेल्या खात्यांवर आजपासून रक्कम जमा करण्याचे देण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.