विरार: वसईतील भुईगावमधील वादग्रस्त आशिर्वाद प्रार्थना केंद्राचे संचालक आणि वादग्रस्त धर्मप्रचारकर सबॅस्टीयन मार्टिन हे राहत्या घरी मृतावस्थेत आढळले आहेत.

 

मार्टिन यांचं निधन कशामुळे झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही. पहाटे तीनच्या सुमारास ते मृतावस्थेत आढळले. मार्टिन हे एप्रिल महिन्यापासून आजारी होते. तेव्हापासून ते प्रार्थना केंद्रात जात नव्हते.

 

वसई-विरार परिसरात मार्टिन यांचं नाव नेहमीच चर्चेत आणि वादात राहिलं आहे. मार्टिन हे दुबळ्या गरिबांचा फायदा घेऊन, त्यांचं धर्मपरिवर्तन करत होते, असा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहे.

 

जादू, चमत्कार असल्याचं भासवून वसई-विरार परिसरात त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रम घेतले आहेत. मात्र त्याला ख्रिश्चन धर्मीयांतील काही जणांसह विविध धर्मातील अनेकांनी आक्षेप घेतला होता.