मिरा रोडमध्ये रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणं तरुणाला महागात
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 02:28 AM (IST)

मिरा रोड : रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणं एका 30 वर्षीय युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. दुभाजकावरुन पडल्यानंतर पायावरुन ट्रक गेल्यामुळे मोहम्मद उस्मान खानला आपला पाय गमवावा लागला आहे. घोडबंदर येथील चैनागावच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. ती हटवण्यासाठी मोहम्मद कारमधून खाली उतरला. रस्ता ओलांडत असताना दुभाजकात पाय अडकल्याने तो रस्त्यावर पडला. खाली पडल्यानंतर त्याच्या पायावरुन ट्रक गेल्यानं त्याला आपला पाय गमवावा लागला. प्रसंगावधान राखून मोहम्मदच्या मित्राने त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. मोहम्मदवर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याचा पाय कापावा लागला आहे.