मुंबई : कर्नाटकमध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मागणी इतक्या श्रमिक स्पेशल ट्रेन उपलब्ध करुन दिल्या नाहीत. गुजरातला मात्र महाराष्ट्राच्या तीन ते चार पट ट्रेन उपलब्ध करुन दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय महाराष्ट्रात लोकल सुरु करण्याच्या मागणीबाबत रेल्वे काही ठोस भूमिका घेत नाहीय. राज्यांतर्गत रेल्वेही सुरु करत नाही हे सगळं एक षडयंत्रच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आज कर्नाटकमध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला रेल्वे बोर्डानं परवानगी दिली. कर्नाटकमध्ये बंगळुरु ते म्हैसूर, बंगळुरू ते बेळगाव अशा दोन ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे राज्यांतर्गत ट्रेन सुरु करायला परवानगी मिळालेलं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरतंय. महाराष्ट्रात स्थलांतिरत मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, अशावेळी महाराष्ट्रातही अशा ट्रेन सुरु होण्याची गरज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांसोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठी नियंत्रित पद्धतीनं लोकल सुरु व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, अद्याप त्या दिशेनं कुठली हालचाल अद्याप दिसत नाहीय. त्या पार्श्वभूमीवर आता युथ काँग्रेसनं रेल्वे महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप केलाय.


घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार

रेल्वे विभागाचा महाराष्ट्रावर अन्याय
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकाकडे केलेल्या मागणी इतक्या श्रमिक ट्रेन उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. गुजरातला मात्र महाराष्ट्रापेक्षा तीन ते चार पट रेल्वे दिल्यात. तर, मुंबई लोकलच्या बाबतीत काहीच ठोस भूमिका घेतली नाही. राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याबद्दलही काहीच निर्णय घेतला नसल्याचा आरोप युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. कर्नाटक सरकारला राज्याअंतर्गत रेल्वे चालवण्याला परवानगी दिली आहे. राज्यातल्या राज्यात ट्रेन चालवायला परवानगी मिळालेलं कर्नाटक हे बहुदा देशातले पहिले राज्य आहे. बंगळुरू ते बेळगाव, बंगळुरू ते म्हैसूर अशी ट्रेन चालवायला परवानगी देण्यात आली आहे.

अजूनही लाखो मजुर महाराष्ट्रात अडकून
आतापर्यंत सव्वाचार लाखांहून अधिक परप्रांतिय मजूरांना त्यांच्या घरी सोडले आहे. मंगळवार रात्रीपर्यंत पाच लाखांहून अधिक कामगार त्यांच्या घरी पोहोचतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडीओ संदेश जारी करुन दिली आहे.

Balasaheb Thorat | कोरोना संकटकाळात भाजप राजकारण करतंय; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका