मुंबई : मुंबईत हक्काचे घर हवे असणाऱ्या 217 जणांचे स्वप्न आज म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. 217 सदनिकांसाठी सुमारे 66 हजार अर्ज करण्यात आले होते. राशी कांबळे या अल्प उत्पन्न गटातून पहिल्या विजेत्या ठरल्या आहेत. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी चेंबूरच्या सहकार नगरमधील 170, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 47 सदनिकांचा समावेश होता.

दरम्यान, आज म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या ऑगस्टमध्ये गिरणी कामगारांसाठी 3 हजार 800 घरांची बंपर लॉटरी काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय कोकण आणि मुंबई महामंडळाची लॉटरी निघणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

आजच्या सोडतीला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण उपस्थित होते.

सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत.

व्हिडीओ पाहा



मुंबई मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांमधल्या 217 सदनिकांच्या विक्रीसाठी 6 मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 13 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करणे, ऑनलाईन पेमेंट आणि आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 24 मे 2019 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. या काळात 66 हजार 84 अर्ज प्राप्त झाले होते.
घरांची सोडत


मध्य उपन्न गट (MIG )

पवई - 46 घरं

सहकार नगर चेंबूर 23 - 01 घरं


अल्प उत्पन्न गट (LIG)

सहकार नगर चेंबूर 2 - 64 घरं

सहकार नगर चेंबूर 23 - 41 घरं

सहकार नगर चेंबूर 23 - 13 घरं

सहकार नगर चेंबूर 37- 52घरं