मुंबई : 'म्हाडा'ची घरं आपल्या खिशाच्या आवाक्यात आहेत, असं वाटणाऱ्यांचा काहीसा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत म्हाडाच्या 819 घरांपैकी 204 घरांची किंमत दीड ते दोन कोटींच्या जवळपास आहे.


म्हाडाच्या घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे 16 सप्टेंबरपासून तुम्ही घरासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. म्हाडातर्फे मुंबईतील 819 सदनिकांसाठी 10 नोव्हेंबरला सोडत होणार आहे. विविध वर्तमानपत्रं आणि म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहिरात पाहायला मिळणार, अशी माहिती मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली आहे.

या जाहिरातीनुसार लोअर परेलमध्ये उच्च उत्पन्न गटातील दोन घरांची किंमत दोन कोटींच्या जवळपास आहे. 44.21 चौरस मीटरच्या या घरांची किंमत 1 कोटी 95 लाख, 67 हजार 103 आहेत. तर लोअर परेलमधीलच 33.82 चौरस मीटरच्या घरांसाठी 1 कोटी 42 लाख, 96 हजार 517 रुपये मोजावे लागणार आहेत. उच्च उत्पन्न गटात सुमारे दीड कोटी रुपये किंमत असलेली 34 घरं लोअर परेलमध्ये आहेत.

याशिवाय पवईमधील तुंगा परिसरातील म्हाडांच्या घरांचे दरही दीड कोटींच्या घरात आहेत. 68.69 चौरस मीटर घरांची किंमत 1 कोटी 39 लाख रुपये आहेत. इथे म्हाडाची 168 घरं उपलब्ध आहेत.

म्हाडाच्या 819 घरांसाठी लॉटरी, कोणत्या गटासाठी किती घरं?

मुंबईतील म्हाडाची महागडी घरं
* लोअर परेल - उच्च उत्पन्न गट - 44.21 चौरस मीटर - किंमत 1 कोटी 95 लाख 67 हजार 103 रुपये - उपलब्ध घरं - 2
* लोअर परेल - उच्च उत्पन्न गट - 33.80 चौरस मीटर - किंमत 1 कोटी 42 लाख 96 हजार 517 रुपये - उपलब्ध घरं - 34
* तुंगा पवई - उच्च उत्पन्न गट - 68.69 चौरस मीटर - किंमत 1 कोटी 39 लाख - उपलब्ध घरं - 168

कुठे किती घरं?
* अत्यल्प गट 8 घरं : प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली

* अल्प उत्पन्न गट 192 घरं : कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप  कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड

* मध्यम उत्पन्न गट 281 घरं : प्रतीक्षा नगर- सायन,  सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम),  उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड

* उच्च उत्पन्न गट 338 घरं : लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप  कांदिवली (पश्चिम), शिंपोली – कांदिवली (पश्चिम)

म्हाडा लॉटरी: पगार दीड लाख, तरीही आमदारांना अल्प गटात राखीव घरं

www.abpmajha.in

कोणत्या गटासाठी किती घरं?
* अत्यल्प उत्पन्न गट – 8 घरं
* अल्प उत्पन्न गट – 192 घरं
* मध्यम उत्पन्न गट – 281 घरं
* उच्च उत्पन्न गट – 338 घरं
* एकूण – 819

www.abpmajha.in

डिपॉझिट किती?
* अत्यल्प उत्पन्न गट –  15 हजार 336 रुपये
* अल्प उत्पन्न गट – 25 हजार 336 रुपये
* मध्यम उत्पन्न गट – 50 हजार 336 रुपये
* उच्च उत्पन्न गट – 75 हजार 336 रुपये

www.abpmajha.in

कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा :
* अत्यल्प उत्पन्न गट –  25,000
* अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50000 रुपये
* मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये
* उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त

घरांच्या किमती :
* अत्यल्प उत्पन्न गट : 15 ते 20 लाख रुपयांदरम्यान
* अल्प उत्पन्न गट : 23 ते 35 लाख रुपयांदरम्यान
* मध्यम उत्पन्न गट : 36 लाख ते 56 लाख रुपये
* उच्च उत्पन्न गट : 72 लाख ते 1 कोटी 96 लाख

www.abpmajha.in

महत्त्वाच्या तारखा:
* ऑनलाईन नोंदणी – 16 सप्टेंबर 2017 पासून
* ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख – 21 ऑक्टोबर 2017
* ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 17 सप्टेंबर 2017 पासून
* ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 ऑक्टोबर 2017 पर्यंत
* ऑनलाईन पैसे भरण्याची मुदत – 17 सप्टेंबर 2017
* डीडी किंवा पे ऑर्डरने पैसे भरण्याची अंतिम तारीख – 25 ऑक्टोबर 2017
* लॉटरीची तारीख – 10 नोव्हेंबर 2017

www.abpmajha.in