मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण 1,69,702 जणांनी अर्ज केला होता. मात्र, 1,25,219 जणांनी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे ज्यांनी ही रक्कम भरली आहे तेच लॉटरीसाठी पात्र ठरणार आहेत.

 

म्हाडानं मुंबई विभागातल्या 972 घरांसाठी 22 जून 2016 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठी 1 लाख 69 हजार 702 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 25 हजार 219 जणांनी पैसे भरले आहेत.

 

आलेल्या लाखो अर्जांची सध्या छाननी सुरु आहे. पात्र अर्जांची पहिली यादी 5 ऑगस्ट 2016 संध्याकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

 
तर पात्र अर्जांची अंतिम यादी ही 8 ऑगस्ट 2016 दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

 
दरम्यान, एकीकडे रियल इस्टेट बाजार मंदावला असला तरीही दुसरीकडे म्हाडाच्या घरांसाठी मोठी पसंती पाहायला मिळते आहे. यंदा 972 घरांच्या लॉटरीसाठी 1,25,219 अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. म्हणजेच एका घरासाठी तब्बल 128 दावेदार आहेत.

 

या घरांसाठी लॉटरी पद्धतीने निकाल 10 ऑगस्टला जाहीर होईल.