मुंबई: केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे.
या बंदमध्ये स्टेट बँकेसह १० लाख बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचं विलनीकरण आणि आयडीबीआय बँकेचं खाजगीकरण या आणि इतर कारणांसाठी बँकांचा आज संप असणार आहे.
या संपामुळे बँकांच्या चेक क्लिअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल.