विरार: तब्बल दोन वर्षांपूर्वी विरारमधून हरवलेल्या एका 12 वर्षीय मुलाला शोधण्यात विरार पोलिसांना यश आलं आहे. करण असं या मुलाचं नाव असून तो भाईंदर उत्तन येथे आपल्या भावाकडे राहायला आला होता. मात्र. फिरायला गेला असतान 2014 साली करण हरवला. मात्र मुळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या करणचा फोटो नसल्याने त्यावेळी करण हरवल्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही.

 

करण घर शोधत शोधत विरारला आला. घराचा पत्ता माहित नसल्याने तो रस्त्यावर उपाशी तापाशी वणवण फिरत अशा अवस्थेत त्याला सकवार विरार येथील एका आदिवासी व्यक्तीला सापडला. तो करणला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याचा सांभाळ करू लागला. पण परिस्थिती गरीब असल्याने त्याला सांभाळणे कठीण होऊ लागले. म्हणून हा व्यक्ती ज्या हॉटेलवर काम करत होता तेथे करण काम करू लागला. पण नीट वागणूक न मिळाल्याने तो तेथून पाळला. यावेळी त्या व्यक्तीन विरार पोलिसांत २०१५ रोजी करण हरविल्याची तक्रार दिली.

 

या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि भिवंडी येथील एका हॉटेल मधून करणाला शोधून काढले. विरार पोलिसांच्या पथकाने भिवंडीतून करणला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या परिवाराकडे सोपवलं आहे.