मुंबई : मुंबईत म्हाडाच्या घरांचं सेवा शुल्क कमी करण्यासाठी तत्वत: मान्यता मिळाल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच फ्लॅट धारकांनी समंती दिल्यास म्हाडा वसाहतींचं पुनर्वसनही म्हाडाच करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले. यामुळे निर्णयामुळे खाजगी बिल्डरांनाही चाप बसणार आहे.

त्याचबरोबर अॅमिनिटी प्लॉटवर रहिवासी किंवा व्यावसायिक बांधकामही होणार नसल्याचा निर्णयही म्हाडा अध्यक्षांनी घेतला आहे. या सर्वांची नियमावली कशी असावी यासाठी मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

VIDEO | म्हाडाचा रिचा बिल्डरला दणका, 1384 प्रकल्पग्रस्त कुटुंबांना न्याय मिळाला | मुंबई | एबीपी माझा



येत्या पंधरा दिवसात महाडच्या वसाहतीमध्ये झालेल्या कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय ज्या अधिकाऱ्यांच्या काळात ही अतिक्रमण झाली आहेत त्याच्यावर ही कारवाई करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत.