मुंबई : मुंबईकरांना नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण नवी मेट्रो लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे. येत्या मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहे. ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार असून सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाईल.
मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए साठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरु होणार आहे. ट्रायल रनसाठी लवकरच बंगळुरुहून मेट्रो ट्रेन्स मुंबईत दाखल होणार आहेत. पहिला कोच येत्या 23 तारखेला मुंबईकडे रवाना होईल आणि 27 तारखेला पोहोचेल. एकूण 576 कोचेस टप्प्याटप्प्यानं मुंबईत दाखल होणार आहेत. नव्या मेट्रो ट्रेन्ससाठी साडेचार हजार कोटींचं क्रॉन्ट्रॅक्ट बीईएमएल कंपनीला देण्यात आले आहे. भारतातच कोचची निर्मीती होत असल्यानं प्रत्येक कोच पाठीमागे 2 कोटी रुपये वाचणार आहेत.
कशी असेल नवी मेट्रो?
- एका कोचमध्ये 380 प्रवासी क्षमता
- एकूण सहा कोचची मेट्रो
- अॅटोमेटिक डोअर
- सीसीटीव्ही सुविधा
- अॅन्टिस्किडींग फ्लोअरिंग
- दिव्यांगांसाठी व्हिलचेअर
- पूर्णत: अॅटोमेटेड सिस्टीम
मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडची जागा पुढील आठवड्यात निश्चित होण्याची शक्यता
कुठे चालेल नवी मेट्रो?
मेट्रो 7
- अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) दरम्यान 16.473 किलोमीटरचा टप्पा
- दहिसर ते डीएन नगर दरम्यान 18.5 किलोमीटर लांब मेट्रो 2 ए कॉरिडोर
- एमएमआरडीए कॉरिडोरसाठी अत्याधुनिक कोच निर्माण केले जात आहेत.
मेट्रो -7 ते स्टेशन
दहिसर (पूर्व),श्रीनाथ नगर (ओवरीपाडा), बोरीवली ओंकारेश्वर (नेशनल पार्क), मागाठाणे बस आगार (बोरिवली), ठाकूर कॉम्प्लेक्स, महिंद्रा एंड महिंद्रा, बाणडोंगरी, कुरार विलेज, विट्ट भट्टी जंक्शन (दिंडोशी), आरे रोड जंक्शन, वी नगर (आरे दूध कॉलनी), हब मॉल (गोरेगांव पूर्व), महानंदा, जेवीएलआर जंक्शन, शंकरवाडी आणि अंधेरी (पूर्व).
मेट्रो 2- ए चे स्टेशन
दहिसर, आनंद नगर, रुशी शंकुल, आईसी कॉलोनी, एक्सर, डॉन बोस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालद मेट्रो, कस्तुरी पार्क, बंगुर नगर, गोरेगांव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर आणि डीएन नगर.