महविद्यालयाचा महिला विकास कक्ष (Womens development cell) विद्यार्थिनी आणि महिलांची बाजू समजून घेत नसतील, तर असे कक्ष नसलेले बरे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. जानेवारी 2015 मध्ये तिने महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाकडे आपला प्रियकर आपल्याला मारहाण करत, अपमानकारक वागणूक देत असल्याची तक्रार केली होती. आठवड्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेत तिला महिला विकास कक्षाच्या समितीसमोर उभे करण्यात आले. मात्र मानसशास्त्राच्या प्राचार्या, इतिहास विषयाचे प्राचार्य, समाजसेवी संस्थेच्या महिला यांचा समावेश असलेल्या समितीने आपली बाजू समजून घेण्याऐवजी आपल्यालाच चुकीचे ठरविल्याचा दावा संबंधित विद्यार्थिनीने केला आहे. तुझ्यावर कोणत्या प्रकारचे उपचार सुरु आहेत का? तू याआधी किती रिलेशनशिप्समध्ये होतीस? असे प्रश्न विचारल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तनुश्रीच्या तक्रारीनंतर नाना, सारंग, आचार्य, सिद्दीकींवर गुन्हा
शेवटी तिच्या प्रियकरावर एका आठवड्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर आपल्या त्रासात भर पडून महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष प्रचंड तणावाखाली आणि अपमान सहन करुन काढावे लागले. त्यामुळे ‘महिला विकास कक्षात विद्यार्थ्यांचा समावेश व्हायला हवा ’ अशी सूचना या विद्यार्थिनीने दिली आहे.
#MeToo चं वादळ
बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण काही दिवसांपूर्वी सांगितली होती. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला.
तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तनुश्रीने आवाज उठवल्यानंतर सोशल मीडियात MeToo वादळाने जोर धरला. विविध क्षेत्रातील महिलांनी #Metoo या हॅशटॅगने आपल्यावरील अत्याचाराची माहिती सोशल मीडियावर दिली.
अलोकनाथ अडचणीत
ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
संबंधित बातम्या
मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर
तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता
तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया
तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला
बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
तनुश्रीच्या तक्रारीनंतर नाना, सारंग, आचार्य, सिद्दीकींवर गुन्हा