मुंबई : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बर मार्गावर वाशी-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकमुळे स्लो मार्गावरील वाहतूक अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावेल.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने आज रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजल्यापासून दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल चालवल्या जाणार आहे.
सोबतच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10.12 वाजल्यापासून दुपारी 4.26 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात ठाणे-वाशी/नेरुळ आणि सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान आज रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत अप-डाऊन फास्ट मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या काळात फास्ट मार्गावरील लोकल स्लो मार्गावरुन वळवण्यात येणार आहे.
मुंबई लोकल : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2018 04:29 PM (IST)
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बर मार्गावर वाशी-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -