मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर, हार्बर रेल्वेवर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर हा मेगाब्लॉक असेल.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर आज सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 03.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ब्लॉकच्या काळात या मार्गावरील लोकलसेवा अप स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत.

मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील वाहतूक उशिराने धावेल. तसंच काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.

https://twitter.com/Central_Railway/status/1104256552431542272

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकच्या दरम्यान या स्थानकांदरम्यान हार्बर रेल्वेची लोकलसेवा पूर्णपणे बंद असेल.


सीएसएमटीसाठी पनवेल, वाशी आणि बेलापूरहून सुटणाऱ्या लोकल सकाळी 9.53 वाजल्यापासून दुपारी 2.44 वाजेपर्यंत बंद असतील. तर सीएसएमटीहून वांद्रे आणि गोरेगावसाठी निघणाऱ्या लोकल सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 या वेळेत बंद असतील.

हार्बरवरील प्रवाशांना मेगाब्लॉकच्या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवासाची मुभा असेल.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर आज जंबोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत हा जंबोब्लॉक असेल.

या काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन स्लो मार्गावरील लोकलसेवा फास्ट मार्गावरुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने धावेल. तसंच काही लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/WesternRly/status/1104219599162159104