मुंबई : मुंबईत मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप स्लो मार्गावर तसंच ट्रान्स हार्बरच्या ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. रेल्वे ट्रॅक्सची डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असेल.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात या स्थानकांदरम्यानची वाहतूक अप फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं धावणार आहे.

छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 10.16 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत निघणाऱ्या डाऊन फास्ट मार्गावरील गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्‍थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्‍या नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशि‍रानं धावतील.

https://twitter.com/Central_Railway/status/931776517629026304

कल्‍याण येथून सकाळी 11.04 वाजल्यापासून दुपारी 03.06 वाजेपर्यंत निघणाऱ्या अप फास्ट मार्गावरील गाड्या आपल्‍या नियोजित थांब्‍यांव्‍यतिरिक्‍त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, आणि कुर्ला या स्‍थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्‍या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनटे उशि‍रा धावतील.

ब्‍लॉकच्या काळात अप स्लो मार्गावर नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्‍थानंकावर उपनगरीय सेवा उपलब्‍ध राहणार नाहीत. या स्‍थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांना भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्‍थानकांमार्गे प्रवास करण्‍याची मुभा असेल.

ट्रान्स हार्बर

ट्रान्स हार्बरच्या ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ठाण्यावरुन वाशी/नेरुळच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या सकाळी 10.35 ते दुपारी 04.07 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच वाशी/नेरुळ स्थानकांवरुन ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या सकाळी 10.45 ते दुपारी 04.09 वाजेपर्यंतच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्‍लॉक काळात ट्रान्‍स हार्बर मार्गावरील प्रवाशांना  हार्बर किंवा मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍याची मुभा असेल.

आज हार्बर मार्गावर कुठलाही मेगा ब्‍लॉक घेण्‍यात येणार नाही.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गांवर शनिवारी 18 नोव्हेंबरला मध्यरात्री मेगाब्लॉक घेतल्यानं आज रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसेल.

https://twitter.com/WesternRly/status/931844361079238656