मिरा रोड : दिल्लीहून मुंबई फिरण्यासाठी आलेल्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार दिवसात दोघांनी नऊ सोनसाखळ्या चोरल्या होत्या.

आकाश लाल आणि भीकू हे आपल्या नातेवाईकांकडे मुंबई फिरण्यासाठी आले होते. मिरा रोडमध्येच राहणाऱ्या आकाश सिंह आणि विमल सिंह या दोघांच्या मदतीनं भीकूनं बाईक विकत घेतली. चारच दिवसात त्यांनी 9 सोनसाखळ्या चोरल्या.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आकाश सिंह आणि विमल सिंह यांना पकडण्यात आलं. तर आकाश लाल यालाही पोलिसांनी दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या. या तिघांकडून पोलिसांनी 175 ग्रॅम सोनं हस्तगत केलं आहे.

चौथा आरोपी भिकू अजूनही फरार आहे. त्याच्या नावावर दिल्ली पोलिसात 75 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.