मुंबई : मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप धीम्या मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते बांद्रा या अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या दरम्यान अनेक ट्रेन्स कॅन्सल केलेल्या असतील आणि उशिराही धावत असतील.

मध्य रेल्वे

मुलुंड ते माटुंगा दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व धीम्या गाड्या ठाण्यापासून मुलुंड ते माटुंगा दरम्यान वळवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊन तसेच चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप मार्गांवर मेगाब्लॉक आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान अप डाऊन मार्गावर, तर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान अप मार्गावर मेगाब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे

सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान मेगाब्लॉक आहे. यावेळेत सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावरुन धावतील.