मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान, मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लाक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान लोकल काही वेळ उशीराने धावतील.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही गाड्या रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.


मध्य रेल्वे


मध्य रेल्वेवर कल्याण आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.25 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरुन धावतील. तर ठाणे ते सीएसएमटीदरम्यान गाड्या जलद मार्गावरुन धावतील.


ट्रान्स हार्बर


ट्रान्स हार्बरम मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान अप हार्बर मार्गावर सीएसएमटीहून पनवेलला सकाळी 11.06 ते दुपारी 4.01 दरम्यान तर डाऊन मार्गावर पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीला सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 दरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. काही विषेश लोकल या काळात सोडण्यात येणार आहेत.