मुंबईत मध्य रेल्वेवर 9 तासांचा मेगाब्लॉक
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 23 Oct 2016 07:03 AM (IST)
मुंबई : दिवा स्थानकात मध्य रेल्वेवर चौथा 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकावरील या ब्लॉकमुळे कल्याण सीएसटी दरम्यानच्या जलद लोकल धिम्या मार्गावर धावतील. तसंच सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरी-दादर-रत्नागिरी ट्रेन पनवेलपर्यंत धावणार आहे. हार्बर लाईनवरही मेगाब्लॉक मध्यरेल्वेच्या हार्बर लाईनवरही ब्लॉक घेण्यात आहे. सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान सकाळी, साडेदहा ते साडेचार पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान लोकल रद्द केल्या जाणार आहेत.