मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49  या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाउन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी 10.41  ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.


अप आणि डाऊन मार्गावरील पहिली आणि शेवटची लोकल


ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.18 वाजता सुटणारी ठाणे लोकल असेल. तसेच ब्लॉकनंतर पहिली लोकल डोंबिवली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळी 4.01 वाजता असेल.अप मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी 9.13 वाजता सुटणारी बदलापूर लोकल असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून दुपारी 3.36 वाजता असेल.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक


सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10  पर्यंत ठाणे-वाशी,नेरळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 या वेळेत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी नेरुळ, पनवेळ येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. त्यामुळे रविवारच्या ट्रान्सहार्बर मार्गावरुन प्रवास करणार असाल तर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी रेल्वेचं वेळापत्रक वाचा.


डाउन अप ट्रान्स-हार्बर मार्गावर


ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 10.35 वाजता सुटणार आहे. तसेच ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे  येथून सुटणारी 4.19 वाजता असेल. ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल वाशी येथून सकाळी 10.15 वाजता सुटणार आहे. पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या ब्लॉकनंतर ठाणे  येथे जाणारी पहिली लोकल दुपारी 3.53 वाजता असेल. दरम्यान रेल्वेने देखील प्रवाश्यांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 


ही बातमी वाचा : 


Ajit Pawar : छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचे मौन, कोणतीही प्रतिक्रिया नाही