Ulhasnagar Firing Case : उल्हासनगरमधील गोळीबार (Firing) प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया यावर आली आहे. "गोळीबार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत डीजींना आदेश देण्यात आल्याची माहिती" फडणवीसांनी दिली आहे. फडणवीस हे बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.


दरम्यान यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, "कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल. गोळीबाराची ही घटना पोलीस स्टेशनमध्ये का घडली?, गोळीबार झाला याच सत्य आपल्याला काढावा लागेल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजीना दिले आहेत. या संदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, असं यावेळी फडणवीस म्हणाले.


काय आहे प्रकरण? 


मागील तीन दिवसांपासून एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. दरम्यान, शुक्रवारी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र, पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे, "मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.  झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


अडवाणी या देशाचे लोहपुरुष


त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न मिळाला हे मला तुमच्याकडूनच माहिती मिळाला आहे. जर जाहीर झाला असेल तर ते खऱ्या अर्थाने लालकृष्ण अडवाणी हे या देशाचे लोहपुरुष आहेत. ज्याप्रमाणे आडवाणीनी या देशाची सेवा केली, एक गृहमंत्री म्हणून त्याचे खूप मोठे योगदान आहे. सातत्याने देशाच्या विचार मनामध्ये असणारे ते होते. 70 वर्ष या देशातच्या राजकारणात होते, मात्र एकही कलंक त्यांच्यावर नाही. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद असल्याचं देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Video: भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार, ‘असा’ होता थरार! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर