मध्य रेल्वे
कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर ब्लॉक
मध्यरेल्वेच्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर सकाळी 11.45 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या काळात अप फास्ट मार्गावरील लोकलसेवा अप स्लो मार्गावरुन वळवण्यात आली आहे. ठाण्यापासून अप फास्ट मार्गावरील लोकलसेवा पुन्हा फास्ट मार्गावरुन वळवली जाईल. त्यामुळे अप फास्ट मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे उशिरानं धावेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत सुटणाऱ्या लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुंलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिरानं धावेल.
पॅसेंजर रेल्वे
ट्रेन नंबर 50104 रत्नागिरी दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत धावेल
ट्रेन नंबर 50103 दादर रत्नागिरी दिवा स्थानकावरुन सुटेल
दादर, एलटीटी, आणि सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 20 ते 30 मिनिटे उशिरानं धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
अप मार्गावर पनवेल, बेलापूर आणि वाशी स्टेशनवरुन सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या सर्व लोकल सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 या वेळात धावणार नाहीत.
डाऊन मार्गावर सीएसएमटी स्थानकांवरुन वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी धावणाऱ्या लोकल सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 वाजेपर्यंत बंद राहतील.
मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गांवर विशेष लोकल चालवल्या जातील.
सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हार्बरच्या प्रवाशांना मध्य आण ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा असेल.