मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या चरणी एका भाविकाने 1 किलो 101 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्या आहेत. या दोन्ही मूर्तींची किंमत सुमारे 31 लाख 51 हजार रुपये आहे.


गणपती आणि लक्ष्मी अशा या दोन सोन्याच्या मूर्ती आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका भाविकाने दानपेटीत ह्या मूर्ती टाकल्या होत्या. या मूर्ती दान करणाऱ्या भाविकाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही.



नवसाला पावणारा गणपती अशी लालबागचा राजाची ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक बाप्पाकडे नवस करतात आणि तो फेडण्यासाठी त्याच्या चरणी लीन होतात.

दरवर्षी लालबागचा राजाच्या चरणी भाविकांकडून कोट्यवधींची देणगी अर्पण केली जाते. लालबागचा राजा गणेश मंडळ ह्या देणगीचा लिलाव करुन, त्यामधून येणाऱ्या पैशांचा उपयोग समाजपयोगी कामांसाठी केला जातो.