मुंबई : मुंबईतील रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या सेवेवर परिणाम होणार आहे.


मध्य रेल्वे :

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाण्यादरम्यान अप फास्ट मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावरुन वळवण्यात आली आहे. अप फास्ट मार्गावरील सर्व लोकल्स या वेळेत कल्याण आणि ठाण्यादरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.

दरम्यान 50104 रत्नागिरी दादर पॅसेंजर गाडी दिवा स्टेशनपर्यंत धावेल, तर 50103 दादर- रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातूनच रवाना होईल.

पश्चिम रेल्वे :

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आङे. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल अप आणि डाऊन स्लो मार्गावरुन धावतील.

हार्बर रेल्वे :

हार्बर मार्गावर अप कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकदरम्यान सीएसटी ते पनवेल बेलापूर आणि वाशीसाठी निघणाऱ्या सर्व लोकल्स सकाळी 10.20 नंतर दुपारी 3.48 पर्यंत बंद राहातील. मेगाब्लॉकदरम्यान सीएसटी ते कुर्ला आणि वाशी पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर किंवा मध्य रेल्वेवरुप प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.