Mumbai Local Mega Block : विकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा. सिग्नल यंत्रणा आणि रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य रेल्वे (Central Railway), पश्चिम रेल्वे (Western Railway) आणि हार्बर मार्गावरील (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मुंबई लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक जरुर तपासा. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा.


आज रविवारी 18 सप्टेंबर रोजी मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉक नसल्याने दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही. ट्रान्सहार्बर मार्गावर आणि मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर कोणत्या वेळेत मेगाब्लॉक आहे.. याबाबतची माहिती जाणून घ्या...
  
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रे्न्स भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळवल्या जातील.


घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.


ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.