मध्य रेल्वे :
- मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत मेगाब्लॉक
- मुलुंडे ते माटुंगादरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक सकाळी 10.59 ते दुपारी 4.20 पर्यंत अप धीम्या मार्गावरुन चालवण्यात येणार
- डाऊन जलद मार्गावरील लोकलना सकाळी 10.8 ते दुपारी 2.42 दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबा देणार
- सर्व लोकल 15 मिनिटं उशिराने धावणार
- रत्नागिरी – दादर पॅसेंजर ट्रेन दिवा रेल्वेस्थानकापर्यंतच चालवली जाणार आणि तिथूनच परतीच्या प्रवासाला रवाना होईल
हार्बर रेल्वे :
- नेरुळ ते पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
- सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या वेळेत मेगाब्लॉकची कामं केली जातील.
- नेरुळ ते पनवेलवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहातूक सेवा सकाळी 11.1 ते दुपारी 4.26 पर्यंत बंद
- ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूकही सकाळी 11.4 ते दुपारी 4.4 पर्यंत नेरुळ ते पनवेल दरम्यान बंद
- पनवेल ते अंधेरी दरम्यानची वाहतूक देखील बंद
- दोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते नेरुळ आणि ठाणे ते नेरुळ दरम्यान विशेष लोकल सेवा
पश्चिम रेल्वे :
- चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
- अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मेगाब्लॉक असेल
- धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरुन धावतील
- काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील