मुंबई : आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. मागच्या आठवड्यात तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण गुरुवारी मागे घेण्यात आलं, मात्र त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला होता. आता आज 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे ऐन राखीपौर्णिमेदिवशी मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.


बेस्ट संयुक्त कामगार  कृती समितीनं मागच्याच आठवड्यात चार दिवस वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. 6 ऑगस्टपर्यंत आपल्या वेतनविषयक मागण्या मान्य न झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य न झाल्यानं ते आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचं हत्यार उपसलं होतं.

संबंधित बातम्या :

येत्या 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार

अखेर 22 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळणार!

…तर ‘बेस्ट’ कर्मचारी 22 जूनपासून संपावर

बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारात 10-10 ची नाणी, पिशवी घेऊन जाताना….

बेस्ट कर्मचाऱ्यांचे मार्चचे पगारही टांगणीवर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावर तात्पुरता तोडगा

बेस्ट समिती अध्यक्षांनाच कर्मचाऱ्यांच्या वेदनेचा विसर?