मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज (रविवार) 12 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात य़ेणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा एकदा खोळंबा होण्याची शक्यता आहे. तीनही मार्गावरील हा मेगाब्लॉक सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत घेतला जाईल.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल दिवा आणि परळ स्थानकांमध्ये धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यानंतर या लोकल पुन्हा जलद मार्गावर चालवल्या जातील. या कालावधीत लोकल सेवा किमान 20 मिनिटे उशिराने धावतील.
सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व जलद आणि धीम्या लोकल सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान आज सकाळी 10.35 ते दु. 3.35 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालवणार असून काही फेऱ्या रद्दसुद्धा केल्या जाणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 ब्लॉक चालेल. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत स. 10.34 ते दु. 3.39 तर पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. 10.21 ते दु. 3.41पर्यंत सेवा खंडित राहील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील.
मध्य रेल्वेवर सोमवारी विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेवर दिवा स्थानकाकडे सोमवारी 13 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 ते सकाळी 6.40 पर्यंत नवीन पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे.
रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2018 07:56 AM (IST)
मध्य रेल्वेवर दिवा स्थानकाकडे सोमवारी 13 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 ते सकाळी 6.40 पर्यंत नवीन पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -