मुंबई : तांत्रिक कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान 11.15 ते 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.


या काळात फास्ट मार्गाची वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली जाईल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी स्थानकादरम्यान सकाळी 10 ते 4.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद राहिल.

पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू रोड स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुंबई आणि विरारहून डहाणूला जाणाऱ्या एकूण 5 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर 2 गाड्या या 30 ते 40 मिनिटे उशिराने पालघर पर्यंतच धावतील.

दरम्यान वापी पॅसेंजर, वलसाड पॅसेंजर तसेच अहमदाबाद पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहेत.