मुंबई : सैनिक पत्नींसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या वेतनासंदर्भात विधानपरिषद गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे. यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानभवनात दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे.
आक्षेपार्ह विधानानंतर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांना मार्च 2017 च्या अधिवेशनात दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं सदस्यत्व रद्द केलं नसल्याने त्यांना निलंबन भत्ता देण्याबाबत आज बैठकीत चर्चा होणार आहे.
काय आहे प्रकरण?
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केलं होतं.
राम कदम यांचीही मुक्ताफळं
प्रशांत परिचारक यांच्या विधानाने राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यातच भाजपच्या आणखी एका आमदाराने मुक्ताफळं उधळळी आहेत. भाजपचे मुंबईतील घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या विधानाबाबत संताप व्यक्त होत आहे.
प्रशांत परिचारकांच्या वेतनासंदर्भात विधानपरिषद गटनेत्यांची बैठक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2018 11:29 AM (IST)
यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानभवनात दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे. आक्षेपार्ह विधानानंतर प्रशांत परिचारकांना मार्च 2017 च्या अधिवेशनात दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -