उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 02:57 PM (IST)
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंब्याबत शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा झाली. या चर्चेअंती शिवसेनेन पाठिंब्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील मातोश्रीवरील बैठक संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि माझा जुना परिचय असल्याने बराच वेळ चर्चा झाली. मात्र बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. राणेंना डावलून पक्षातील उमेदवार देण्याचा भाजपचा निर्णय शिवसेनेच्या विरोधामुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी नारायण राणेंचा पर्याय डावलून पक्षातलाच उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र भविष्यात राणेंना मंत्रिमंडळात कधीच घेणार नाही याबाबत आताच भूमिका स्पष्ट करता येणार नाही, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. तर भाजपने दिलेल्या उमेदवराला पाठिंबा देण्याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय कळवू असं उद्धव यांनी स्पष्ट केलं. इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाही मातोश्रीवरील भेटीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा खड्ड्यांचा दौऱ्याबाबत माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. "मी फक्त मला दिलेलं काम पार पाडतो, इतर कामात ढवळाढवळ करत नाही. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर असल्याने एकाच विमानात जा, अशी विनंती त्यांना केली. मात्र वेळ वेगळी असल्याने ते शक्य नाही," असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. "उद्धवजींचं कोल्हापुरातच काय अवघ्या महाराष्ट्रात नेहमीच स्वागत करु," असंही ते म्हणाले. पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 27 नोव्हेंबरला विधानपरिषद पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात कोणाची राजकीय समीकरणं जुळतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. संबंधित बातम्या राणेंबाबत संभ्रम कायम, भाजपकडून इतर उमेदवारांची चाचपणी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वर विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?