30 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निकालानुसार आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
VIDEO | वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचं सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलन | मुंबई | एबीपी माझा
मराठा आरक्षण लागू होण्याआधी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आले होते, त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या मराठा आरक्षणाचा लाभ मेडिकल क्षेत्रातील मराठा विद्यार्थांना घेता येणार नाही, असे कारण कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.