मुंबईच्या महापौरपदासाठी ‘या’ नगरसेवकांची नावं चर्चेत
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2017 12:14 AM (IST)
मुंबई: मुंबईच्या महापौरपदासाठी सेना भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली. पालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. यंदा महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांतून मोठ्या प्रमाणात इच्छुक दिसून येत आहेत. शिवसेनेकडून ६ नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शिवाय ३ माजी महापौरांनाही संधी दिली जाऊ शकते. तर भाजपला महापौरपदासाठी मराठी चेहऱ्यांची वानवा भासत असल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडून महापौर पदासाठी ही नावं चर्चेत: 1) आशिष चेंबुरकर, १५ वर्ष अनुभव, माजी बेस्ट समिती अध्यक्ष, विभागप्रमुख 2) मंगेश सातमकर, १० वर्षे अनुभव 3) यशवंत जाधव, शिवसेना उपनेता ४) रमेश कोरगांवकर ५) राजुल पटेल, अनुभवी चेहरा ६) किशोरी पेडणेकर, अनुभवी नगरसेविका, संपर्कप्रमुख जुन्या महापौरांना संधी दिली तर: १) विशाखा राऊत २) मिलिंद वैद्य ३) श्रद्धा जाधव मुंबईत भाजपला पहिल्यांदा महापौर मिळणाऱ्यांची शक्यता निर्माण झाल्यानं दावेदार मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपमधील महापौर पदासाठी संभाव्य नावे: १. डॉ . राम बारोट २. अतुल शहा, माजी आमदार ३. मनोज कोटक, गटनेते, अनुभवी नगरसेवक ४. प्रभाकर शिंदे , शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले, माजी सभागृह नेता