रायगड: पर्यटकांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन लवकरच ट्रॅकवर धावणार आहे. नेरळ-माथेरान रेल्वे मार्गावर अमन लॉज ते माथेरान या ट्रॅकवर सध्या दुरुस्तीचं काम सुरु आहे.
मध्य रेल्वेच्या डिव्हीजन मॅनेजर यांच्या वतीनं या कामाची पाहणी करण्यात आली. माथेरान मिनी ट्रेन सेवा लवकर पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
आठ महिन्यांपूर्वी काही डबे घसरल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. पण, आता दुरुस्ती कामानंतर पर्यटकांचं आकर्षण असलेली ही मिनी ट्रेन पुन्हा धावणार आहे.