नवी मुंबई : पनवेलमधील खांदेश्वर पोलिसांनी 35 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसंच 2 किलोंची सोन्याची बिस्किटंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नवीन पनवेलमध्ये हा कारवाई करण्यात आली आहे.
नवीन पनवेलमध्ये पकडण्यात आलेल्या 35 लाखांपैकी साऱ्या नव्या 2000 च्या नोटा आहेत. तसंच जप्त करण्यात आलेलं 2 किलो सोनं नेमकं कुणाचं आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान अटक करण्यात आलेले 6 जण नोटा बदलण्यासाठी आले होते का? तसंच कोणत्या व्यापाऱ्याला सोनं देण्यास आले होते याचा तपासही पोलीस करत आहेत. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.