कोरोनाचं सावट | राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली, 149 प्रवासी कोरोना निगेटिव्ह
एन-95 मास्क हे जगभरात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वापरले जातात. कोणतेही संसर्ग होणारे आजार हे मास्क वापरल्याने होणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या मास्कची किंमत काही महिन्यांपूर्वी 30 रुपये इतकी होती मात्र आता हीच किंमत 130 ते 200 रुपये इतकी झाली आहे. या एन-95 मास्कची निर्मिती जरी कंपन्याने वाढवली असली तरी वितरणामध्ये मात्र या एन 95 मास्कचा पुरवठा होत नसल्याचे मुंबईतील मेडिकल मालकांचे म्हणणे आहे. शिवाय, 10 ते 20 नग फक्त या मास्कचे मार्केटमध्ये येत असून ते सुद्धा चारपट किंमतीने मिळत आहेत.
CoronaVirus | देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
तर दुसरीकडे हे मास्कची निर्मिती जरी वाढली असली तरी हे एन 95 मास्क लाखोंच्या संख्येने परदेशात निर्यात केले जात आहेत, त्यामुळे काही मास्क ब्लॅकने देखील विकले जात असल्याच मुंबईतील मेडिकल मालक सांगत आहेत. सध्या बाजारात तीन ते चार प्रकाराचे मास्क मिळतात यामध्ये डिस्पोजेबल 2 प्लाय मास्क, साधे मास्क आणि 5 इन वन एन 95 मास्क. यामधील साध्या मास्कचा तसा फायदा होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण या मास्कपासून विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मास्क वापरल्यानंतर सुद्धा होऊ शकते. कारण हे पूर्णपणे नाक, तोंड झाकू शकत नाही. त्यामुळे एन 95 ज्याला 3 ते 4 लेयर्स असतात आणि ज्या मास्कने तोंड, नाक पूर्णपणे झाकले जाऊन गर्दीच्या ठिकाणी विषाणू पासून संसर्ग होऊ नये यासाठी मदतपूर्ण ठरते. त्यामुळे हे मास्क गर्दीच्या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे.
परंतु मेडिकलमध्ये हे मास्क उपलब्ध नसल्याने शिवाय ऑनलाईन खरेदी करायची असल्यास 200 ते 300 रुपये मोजावे लागत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
CoronaVirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतर्फे होर्डिंग्जद्वारे जनजागृती