मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सहा जण निरीक्षणाखाली असून 146 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधील 65 हजार 621 प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया,जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या 12 देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत 401 प्रवासी आले आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 152 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 149 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर तीन जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या 152 प्रवाशांपैकी 146 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 4 जण मुंबईत तर 2 जण पुणे येथे भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कार्यवाही
राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येत आहे. बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.

या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये कोरोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येत आहे. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.

#CoronaVirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतर्फे होर्डिंग्जद्वारे जनजागृती


अकलूज आणि कोल्हापूरचे भाविक अडकले
तेहरानमध्ये अडकलेल्या मुस्लिम भाविकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. तेहरानमधून सर्व भाविकांची कोरोनासंदर्भात तपासणी करुन त्यांना भारतात आणलं जाणार आहे. अंदाजे २ हजार भारतीय या ठिकाणी अडकलेत. यातील अकलूज आणि कोल्हापूरचे 44 मुस्लिम भाविक आहेत.

CoronaVirus | देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती


एन-95 मास्क उपलब्ध नाही
चीनमध्ये एकीकडे करोनाने थैमान घातलेला असताना देशात सुद्धा करोना संसर्ग झालेले व्यक्ती आढळलेले आहेत. या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एन-95 हे मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो मात्र मुंबईतील बहुतांश मेडिकलमध्ये हे मास्क उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. इतकाच काय तर हे मास्क तुम्हला चुकून मिळाल तरी ते सुद्धा अव्वाच्या सव्वा किंमतीत घ्यावं लागत आहे. जगात मृत्यूतांडव घडवणारा कोरोना, आता भारतातही शिरकाव करू लागला आहे.