मुंबई: गेल्या चार दिवसांपासून सुरु असेलेला डॉक्टरांचा संप अखेर आज ‘मार्ड’नं मागे घेतला आहे. मुंबई हायकोर्टाच्या लेखी आश्वासनानंतर ‘मार्ड’ने निवासी डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं.


‘मार्ड’नं अधिकृतरित्या आपला संप मागे घेतला असला तरी राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर हे सामूहिक रजेवर गेले होते. त्यामुळे मार्डनं जरी संप मागे घेतला असला तरी यावर निवासी डॉक्टर काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे.

‘निवासी डॉक्टरांचा रजेचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावं असं आम्ही आवाहन करत आहोत.’ असं मार्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

‘जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावर रुजू होणार नाही.’ अशी भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नव्हतं. मात्र, आता लेखी आश्वासन मिळाल्यानं मार्डनं आपला संप मागे घेतला आहे.

संबंधित बातम्या:

‘मार्ड’ आंदोलनावर ठाम, डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता

‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’, गिरीश महाजन यांचा दावा

आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार 

नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित

हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट

डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी

राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल

सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे

इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता

धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास

धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती