Maratha Reservation : राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या महिन्यांत झालेल्या हिंसक बाबींची राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. शिवाय या तपासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. 


कशाचा तपास होणार?


राज्यात आरक्षणासाठी विविध आंदोलने करण्यात आली होती. ही आंदोलने सुरु असताना गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा बिघडवणे. वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ आणि हिंसक घटना जाणिवपूर्वक घडवणे. सोशल मीडियाचा आणि माध्यमातून चुकीची माहिती आणि अफवा पसरवणे. अफवा पसरवून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करणे, या बाबींचा तपास एसआयटीकडून करण्यात येणार आहे. शिवाय, तपासाचा अहवाल 3 महिन्यांमध्ये सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. 


विधानसभेत हिंसेबाबत झाली होती चर्चा


महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आरक्षणादरम्यान झालेली हिंसा पूर्व नियोजित होती का? याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. त्या निर्देशांनुसार नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


संदीप कर्णिक यांना कोणते अधिकार देण्यात आले?


तपास पथकांच्या अध्यक्षांना सरकारने काही अधिकार बहाल केले आहेत. तपासासाठी तज्ज्ञ व्यक्तींना बोलावता येऊ शकेल. शिवाय, तपासासाठी लागणारे मनुष्यबळही सरकारकडून संदीप कर्णिक यांना पुरवण्यात येणार आहे. 


मी तुरुंगात सडायला तयार 


आगामी लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा करेक्ट कार्यक्रम होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी मी मराठा समाज आणि सत्ता याच्यातील काटा आहे. हा काटा काढावाच लागणार, असा पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. पण मीदेखील तुरुंगात सडायला तयार आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना निवडणुकीत भाजपला आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 


देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ग्रामीण भागातील 'बुडतीचे पाय डोहाकडे' या म्हणीप्रमाणे आहे. फडणवीस मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. माझ्यावर फुलं टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं? असा सवालही मनोज जरांगेंनी केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ravindra Waikar: पत्नीचा रडवेला चेहरा, स्वत:ची हताश देहबोली; रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेश सोहळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा