मुंबई : एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात हिवाळी अधिवेशनात (Winter Session) चर्चा होत असतांना, दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत मुंबईत (Mumbai) अज्ञात व्यक्तींकडून बॅनर लावण्यात आले आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात मराठा आरक्षणच्या संदर्भात गेल्या 40 वर्षात कोणी मराठा आरक्षणाला खोडा घातला असा सवाल विचारणारे बॅनर लावण्यात आले. आज पहाटे हे बॅनर लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच काही वेळात पोलिसांकडून हे बॅनर काढण्यात आले आहे. 


मुंबईतील चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अज्ञात व्यक्तींकडून मराठा आरक्षणा संदर्भात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवरून मराठा समाजाला गेली 40 वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी आरक्षण दिले नाही आणि आत्ता ते आरक्षणच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे या बॅनरवरून थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे रोख असल्याचे दिसून येत आहे. तर, शरद पवारांचे फोटो देखील या बॅनरवर पाहायला मिळत आहे. तर, यावरील मजकूर पाहता तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी तात्काळ हे बॅनर हटवले आहे. 


बॅनरवर शरद पवारांचे फोटो 


मुंबईच्या चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अज्ञात व्यक्तींकडून मराठा आरक्षणासंदर्भात बॅनर लावण्यात आले. यावर, मनोज जरांगे यांच्या प्रत्येक सभेत त्यांच्यासोबत असणारे प्रदीप सोळुंके यांचे फोटो आहेत. सोबतच आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश बेदरे याचे शरद पवार, जयंत पाटील यांच्यासोबतचे फोटो देखील बॅनरवर पाहायला मिळत आहे. तसेच, आंदोलन कोणी पेटवले, आंदोलनाची टोपी कोण फिरवतंय? असे प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आले आहे. 


असा बॅनरवरील मजकूर...


चेंबूरमध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या बॅनरवर ऋषिकेश बेदरे याचे शरद पवार, जयंत पाटील यांच्यासोबतचे फोटो आहेत. तसेच, “बोल मराठ्या कुणबी होणार का?, बेदरे सांगा कुणाचा?, खाकीवर दगडफेक करणारा कुणाचा? काका, मोठे साहेब,स्वयंघोषित जाणता राजा सांगा मराठा मराठा आरक्षण तुम्ही का दिले नाही?, आंदोलन कुणी पेटवले?, आंदोलनाची टोपी कोण फिरवतंय?” असे प्रश्न देखील विचारण्यात आले आहे. तसेच, यावेळी लावण्यात आलेल्या दुसऱ्या बॅनरवर मनोज जरांगे यांच्या प्रत्येक सभेत त्यांच्यासोबत असणारे प्रदीप सोळुंके यांचे फोटो असून, त्यावर देखील वरीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आले आहे. 


मराठा आरक्षणावर विधानसभेत आजही चर्चा... 


राज्यभरत गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर मंगळवारी हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा झाली. दरम्यान आजही दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावरून चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या याच मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचा देखील पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : आमच्या हातात दंडूके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ: मनोज जरांगे