मुंबई : शहरातील आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकाची प्रकृती खालावलीय. इथं एका आंदोलक तरुणाला भोवळ आलीय. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. मात्र, या आंदोलकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय.


आझाद मैदानावरील मराठा आंदोलक गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरू केला आहे. याच आंदोलनादरम्यान एका युवकाला आज सकाळी भोवळ आली. मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय. मुंबईतील आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळी या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर अशोक चव्हाणांचा दावा

मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम : अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्याकडून आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या बैठकीला एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचीही हजेरी होती. येत्या 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. त्या अनुषंगानं बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कुठल्याही त्रुटी राहता कामा नयेत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मंत्री अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

या मुलांना काही झालं तर याचं पाप या सरकारवर असेल : प्रविण दरेकर
गेल्या 34 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदान येथे उन्हातान्हात आंदोलन करत आहेत. मी स्वतः आझाद मैदान येथे जाऊन या तरुणांची भेट घेतली. या सरकारच्या उपसमितीच्या बैठकीलाही मी हजर होतो. मात्र, या सरकारकडून बैठकांची नाटकं सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. उद्या या तरुणांना काही झालं तर याचं पाप या सरकारवर येईल. तत्काळ शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे मी या सरकारला निर्णय विनंती करतो, की या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजातील तरुणांना न्याय.

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम : अशोक चव्हाण