मुंबई: ईव्हीएम मशिनचं नोटा बटण दाबून मतदारांनी गुन्हेगारी उमेदवारांचं जोरदार इनकमिंग करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना दणका दिला आहे. कारण महापालिका निवडणुकीत मतदारांनी 'नोटा' म्हणजेच दिलेल्या उमेदवारांपैकी कुठलाही उमेदवार पसंत नाही, यावर मोठ्या प्रमाणात मोहोर लावली आहे.

यंदा मुंबई पालिकेसाठी तब्बल 55 टक्के मतदान झालं. मतदानाचा टक्का वाढला असला तरी ‘नोटा'ला विक्रमी पसंती मिळली आहे.

मुंबईत प्रत्येक वॉर्डात किमान 386 मतं नोटाला गेली आहेत. मुंबईच्या सध्याच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि भाजपचे प्रवीण शाह यांच्या वॉर्डात नोटाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

मुंबईसह राज्यातही अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. त्यामुळे ‘नोटा’ हा पर्याय पुढील काही काळात राजकीय पक्षांची नक्कीच डोकेदुखी ठरु शकतो.