Manoj Jarange Patil Mumbai Morcha: कोणत्याही परिस्थितीत सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीपासून सुरू केलेला प्रवास आज मुंबईमध्ये येऊन धडकला. मुंबईमध्ये आज (29 ऑगस्ट) भगवं वादळ अवतरलं असून रस्त्यावर फक्त मराठे दिसू लागले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाची आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली असली तरी सकाळी काही मिनिटांमध्ये आझाद मैदानातील गर्दी फुलून गेली. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये आझाद मैदान तुडुंब गर्दीने भरून गेले. त्यामुळे मैदानाबाहेर सुद्धा मराठा आंदोलकांमध्ये अलोट उत्साह आहे.
हे सरकार काय मराठ्यांना रोखणार?
सीएसएमटी तसेच बीएमसी परिसर सुद्धा सुद्धा गर्दीने फुलून गेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आंदोलकांचा उत्साह सुद्धा गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात केल्यानंतरही आंदोलकांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान आंदोलकांच्या तोंडामध्ये काहीही करून आरक्षण मिळवणार असंच वक्तव्य येत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येण्यावरून ज्या काही चर्चा रंगल्या होत्या त्यावरूनही काही आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली. त्यामधील एका आंदोलकाची प्रतिक्रिया बोलती होती. अनेक जण म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही. मात्र मुघल रोखू शकले नाहीत, आदिलशाही रोखू शकली नाही, हे सरकार काय मराठ्यांना रोखणार? अशा शब्दांमध्ये मराठा आंदोलकांनी आपली भावना व्यक्त केली.
मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करू नका
दरम्यान, सरकारने आता फसवणूक करू नये, जरांगे यांच्या मागण्या मान्य करून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी सातत्याने मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. दुसरीकडे सकाळी दहा वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यांनी मराठ्यांना आवाहन करताना मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करू नका, सरकारने आपल्याला सहकार्य केलं आहे, तर आपणही सहकार्य करू, मुंबई पोलिसांना सुद्धा सहकार्य करूया, पोलीस ज्या ठिकाणी दाखवतील त्या ठिकाणी गाड्या पार्क करा आणि दोन तासांमध्ये मुंबई खाली करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला प्रारंभ करताना केले होते.
दरम्यान, मुंबईमध्ये सर्वत्र मराठ्यांची गर्दी दिसून येत आहे. अजूनही गाड्यांचा ताफाच्या ताफा मुंबईच्या वेशीवरून आझाद मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. त्यामुळे आज एक दिवसाचे आंदोलन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुढील टप्पा कोणता ठरवणार आणि आंदोलनासाठी कोणती दिशा देणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. आज सायंकाळी ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार, सरकारकडून कोणता निर्णय घेतला जाणार, सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
इतर महत्वाच्या बातम्या