Manoj Jarange Maratha Reservation LIVE: मोठी बातमी! कोर्टाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब, मनोज जरांगे पाटलांना तात्पुरता दिलासा
Manoj Jarange Patil Azad Maidan agitation Live Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लाईव्ह अपडेटस्. मुंबई उच्च न्यायालयाकडून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरुन आंदोलकांना हटवण्याचा आदेश.
पार्श्वभूमी
Manoj Jarange Patil Maratha Reservation: आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र न्यायालयाने आता प्रशासनाला अनेक निर्देश दिले आहेत. अशात आझाद मैदानातच आंदोलक थांबावेत, इतरत्र फिरू नये म्हणून...More
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय - मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत - मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी - मान्य
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे - मान्य
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता - मान्य
आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता - मान्य
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या अमान्य?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी - 1 महिन्याची मुदत
मराठा-कुणबी एकच शासन निर्णय - 2 महिन्यांची मुदत
परभणीत मराठा समाज बांधवांचा जोरदार जल्लोष
फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष
मुंबईत त्रास झाला पण मनोज जरांगे आणि मराठे हटले नाहीत ज्याचा विजय झाला
मराठा समाज बांधवांना मानले देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे अजित पवारांचे आभार
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर परभणी मध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला आहे परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी एकत्रित फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला या सर्व मराठा बांधवांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी
Pankaj Kshirsagar Choupal
सकल मराठा समाजाच्या वतीने निलंगा येथे रास्तारोको आंदोलन... सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजताच आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी... टाळ मृदंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांनी धरला ठेका
A/c : मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले... निलंगा शहरातील उदगीर मोड येथील लातूर - जहीराबाद महामार्गावर केले आंदोलन... जवळपास तासभर हे आंदोलन चालले... दरम्यान, सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची सकारात्मक चर्चा झाल्याचे समजतात आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली... तसेच टाळ मृदंगाच्या गजरावर आंदोलनात सहभागी लहान वारकऱ्यांनी यावेळी ठेका धरला...
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारचं उत्तर काय?
1) हैदराबाद गॅझेटियर लागू करा लागू करावे.
सरकारचं उत्तर - हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे. तात्काळ लागू करणार. जीआर काढणार
2) सातारा संस्थान जीआर काढा -
सरकारचं उत्तर -औंध आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत. १५ दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल. जीआर काढणार
3) मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
सरकारचं उत्तर - सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेणार, शासन निर्णय जारी करणार.
मराठा आरक्षण आंदोलनमध्ये बळी गेलेल्या कुटुंबियांना १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन मंडळात नोकरी मिळेल.
जर शिक्षण मुलाचा जास्त आले तर सरकारी नोकरीं द्यावी
4) आम्हाला कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
सरकारचं उत्तर - मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला.
*५) 58 लाख कुणबीच्या नोंदी ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळेल नोंदी मिळाल्या. आज २ तारीख आहे आता गेल्या गेल्या एक आदेश काढा प्रमाणपत्र अनेकांचे अडकले व्हॅलिडिटी मध्ये त्यावर निर्णय घ्या *
उत्तर - जेवढे दाखले आले ते तातडीने द्या असा निर्णय आम्ही घेऊ. आता मनुष्यबळ त्याला दिलं आहे जलदगतीने काम होईल
६) मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे
उत्तर - किचकट आहे त्याला वेळ लागेल 1 महिना लागेल
७) सगेसोयरेचा निर्णय घ्या म्हणालो
उत्तर - याला वेळ लागेल ८ लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे
8) ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या. सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या.
सरकारचं उत्तर - गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार
Thane flash
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव byte pointer
- मी आत्ताच टीव्हीवर पाहिलं उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब, शिवेंद्रराजे भोसले साहेब हे जरांगे पाटील साहेबांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत.त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जात आहेत.निश्चितच चर्चा नंतर मनोज जरांगे साहेब आदेश देतील कार्यकर्त्यांना...
- गणेश उत्सवानिमित्त शिवसेना सचिव संजय मोरे आणि संजय सोनार यांच्या येथे गणेश दर्शनासाठी आलो आहे.
- चर्चा झाल्यानंतर थोड्याच वेळेला आपल्याला रिझल्ट मिळेल.उपसमित्याचे बैठक रोज दोन ते तीन वेळा सुरू आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.
- हा जो विषय चालू आहे तो केंद्राच्या त्याच्यामध्ये संबंध नाही तर राज्याचा संबंध आहे. राज्याच्या कुठला प्रस्ताव जातो केंद्राकडे त्यानंतरच विषय सुरू होतो.
- जरांगे पाटील यांचा जे काही मागण्या आहेत ते राज्य सरकार कडे आहे.
ऑन संजय राऊत
संजय राऊत यांचा सल्ला मुळे उद्धव ठाकरे घरी गेले... असे कुठलेही सल्ला द्यायचं काम संजय राऊत या ठिकाणी करतात.
- सरकारला जेवढं कळतं आणि कोर्टाचे जे काही आदेश असतील. जे काही लोकांचा हिताचा असेल. ते निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार घेतील.
विखे पाटील
आमची भूमिका सकारात्मक आहे
सगळ्या कायद्याच्या बाजू समजून घेऊन आम्ही येथे आलो
जरांगे
आता या सगळ्यात कोणी यामध्ये आडवा आला तर त्याला बाजूला करण्याची जबाबदारी सरकार आणि आमची
सातारा गॅजेट ला १५ दिवस देणार म्हणे त्याला १ महिना देऊ
आता गुन्हे मागे घेणार म्हणे त्याचा जीआर काढा
आधी लेखी द्यायचे आता जी आर काढताय
सातारा गॅजेट आणि हैद्राबाद गॅजेट याचे दोन जी आर काढा
आणि बाकी सगळ्या मागण्याचा एक जीआर काढा
म्हणजे एकूण ३ जी आर काढा
बीड ब्रेक: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निषेध नोंदवत उद्या सर्व पक्ष संघटने कडून बीड जिल्हा बंदची हाक
Anc: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. न्याय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला वेगळ्या मार्गाने अडचणी आणणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय संघटनेकडून जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबतचे आवाहन समाज माध्यमावर करण्यात आलेल्या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने असेल असं देखील आवाहन यादरम्यान करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत उद्याचा बीड जिल्हा बंद असेल..
पाचवी मागणी ५८लाख कुणबी च्या नोंदी ग्रामपंचायत ला लावा म्हणजे लोकांना कळेल नोंदी मिळाल्या
आज २ तारीख आहे आता आता गेल्या गेल्या एक आदेश काढा प्रमाणपत्र अनेकांचे अडकले व्हॅलिडिटी मध्ये त्यावर निर्णय घ्या
विखे पाटील
जेवढे दाखले आले ते तातडीने द्या... असा निर्णय आम्ही घेऊ
जरांगे
जे व्हॅलिडिटी साठी प्रमाणपत्र कुणबीचा आहे तातडीने द्या
विखे
आता मनुष्यबळ त्याला दिला आहे जल्दगतीने काम होईल
जरांगे
वंशावळ समिती तालुका स्तरावर निर्माण करा, आणि शिंदे समितीला कार्यलय द्या
शिंदे समितीला नोंदी सुरु ठेवण्याचा काम सुरु ठेवा ते बंद करू नका
मोडी लिपी समजणारे लोक द्या...
नाहीतर आम्ही देतो
आम्ही फुकट काम करू पैसे नको आम्हाला
* हैदराबादच्या गॅजेटला अंमलबाजावणीला दिली आहे..
* सातारा संस्थानच्या गॅजेटेयर तपासून कायदेशीर पद्धत्तीने जलदगतीने म्हणजेच 15 दिवसांत अमंलबजावणी करु
* सातारा गॅजेटेअर लागू करण्यासाठी मी एक महिना दिला आहे
* सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व मराठा आंदोलकांविरोधातले गुन्हे मागे घेणार
* शैक्षणिक पात्रतेनूसार शासकिय नोकरी देणार
मनोज जरांगे पाटील
आता मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याचा मागणी होती... आता सप्टेंबर अखेरीस सगळे गुन्हे मागे घेण्याचा शासन निर्णय जारी केला जाईल
त्याला मोठी प्रक्रिया आहे
५८ लाख नोंदी चा विषय आपण काढलाय
घायाळ तुम्ही केलं उपोषणामुळे
मराठा आरक्षण आंदोलन मध्ये बळी गेलेल्या कुटूंबियांना १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
राज्य परिवहन मंडळात नोकरीं मिळेल असा यात म्हटलंय
आता यात त्यात बदल करावा
जर शिक्षण मुलाचा जास्त आले तर सरकारी नोकरीं द्यावी
मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षण समितीचा स्वागत करतो
सचिव सुद्धा आज हजर आहे त्यांचा आभार
विषय शांततेत समजून घेण्याची गरज आहे
आपलं म्हणणं होत ते निवेदन आपण सादर केलं होत
पहिली मागणी होती -
हैद्राबाद गॅजेट ची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी होती
आता ते म्हणाले आपल्याला मान्य झालं कीं जीआर काढणार
यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण अभ्यासक सोबत सुद्धा चर्चा करणार
नाहीतर वाशी सारखा व्हायचं
हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे... याचा अर्थ हैद्राबाद गॅजेटची अमलबजवानी करण्याचा सूचना उपसमिती कडून देण्यात येईल
सातारा गॅजेट बद्दल आपण मागणी केली होती
म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठा यामध्ये येत
औंध आणि सातारा मध्ये काही त्रुटी आहेत... १५ दिवसात कायदेशीर त्रुटी चा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल... मी एक महिना देतो... राजे सांगा अंमलबाजवणी करणार का?
हो म्हणा
आता दोन ची अंमलबाजवणी झाली
उद्यापर्यंत सुनावणी तहकूब, 1 वाजता सुनावणी तहकूब
31 मे ला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला.
त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जगा दिली नाही आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही.
ती जागा सत्याग्रहासाठी आहे का तर हो
5000 हजार लोकांना परवानगी होती का तर हो - जरांगेंच्या वकिलांची भूमिका
आम्ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार उच्च न्यायालय
आम्ही लोकांना खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलं आहे - सतीश माने
कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन करण्यात आलं आहे
31 मे ला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला.
त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जगा दिली नाही आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही.
ती जागा सत्याग्रहासाठी आहे का तर हो
5000 हजार लोकांना परवानगी होती का तर हो - जरांगेंच्या वकिलांची भूमिका
आम्ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार उच्च न्यायालय
आम्ही लोकांना खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलं आहे - सतीश माने
कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन करण्यात आलं आहे
आम्ही अद्याप कोणतीही कठोर कारवाई केली नाही राज्य सरकार
तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं
ही तुमची चुकी आहे
कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली
तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं
५० हजारांपेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता उच्च न्यायालय
तुम्ही जर 24 तासांनी संतुष्ट नव्हता, तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं. उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना बजावलं.
आम्ही घोषणा केल्या आणतात सगळीकडे बॅनर लावले आहेत LED screen लावण्यात आल्या आहेत
आणि त्यानंतर लोक कमी झाली आहेत
काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात वाहन आहे
काही लोक ऐकत आहेत तर काही अजिबात ऐकत नाही आहेत
काल रात्रीपासून पोलीस रस्त्यावर असून आम्ही आंदोलनकर्त्यांना विनंती करत आहोत
जरांगे पाटील यांना नोटीस देण्यात आली असून आम्ही त्यांना जागा खाली करायला सांगितलं आहे सराफ
जरांगे यांनी लिखित स्वरूपात किंवा लोकांना आवाहन करून आंदोलनकर्त्यांना मुंबई सोडण्यास सांगाव : सराफ
अनेक आंदोलनकर्ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत सतीश मनेशिंदे
मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर गाड्या हटवण्यात आल्या आहेत
सगळ्या गाड्या बाहेर पाठवण्याचे आहेत जरांगे पाटील यांनी दिले आहेत
उपसमितीची बैठक सुरू असून विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत
सतीश मनेशिंदे पाटील यांचे वकील
सगळ्या गाड्या अजून तिथेच आहेत राज्य सरकरची भूमिका
परवा सुनावणी ठेवावी जरांगे पाटील यांच्या वकिलाची मागणी
तुम्ही तिथे का थांबला आहात कोर्टाचा सवाल
आझाद मैदानात केवळ 24 तासांची परवानगी दिली होती मुंबई उच्च न्यायालय
आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत पाटील यांचे वकील
आता पर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले आहेत वकील
तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात तुम्हाला परवानगी नाही - कोर्टाची विचारणा
तुम्हाला कोर्टाचे आदेश दिले आहेत कोर्टाची भूमिका, आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात परवानगी होती, ते तिथे आणखीन थांबू शकत नाहीत, ते शहरात इतरत्र कुठेही थांबू शकतात - मुंबई उच्च न्यायालय
तुम्ही सतत नियमांच उल्लघंन करत आहात : उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयात वकील येण्यास सुरवात
काही वेळातच सुनावणी होणार सुरू
कोर्टाच्या आदेशानंतर काय कारवाई केली याचा लेखाजोखा द्यावा लागणार
कोर्टाच्या सूचनानंतर आता मराठा आंदोलन मुंबईतील विविध ठिकाणाहून पुन्हा आझाद मैदानाकडे जात आहे.
पोलीस ऍक्शन मोडवर आल्यानंतर आंदोलन देखील संयमाच्या भूमिकेत
न्याय देवताच्या सूचनांचा पालन केलं जाईल शांततेत आंदोलन सुरू राहील मनोज जरांगे पाटील आता जो आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य असेल - आंदोलक
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. न्याय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला वेगळ्या मार्गाने अडचणी आणणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय संघटनेकडून जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबतचे आवाहन समाज माध्यमावर करण्यात आलेल्या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने असेल असं देखील आवाहन यादरम्यान करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत उद्याचा बीड जिल्हा बंद असेल...
मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस
आंदोलकांची दाडी, केस वाढल्याने कटिंगची मोफत सुविधा
वाशी येथील सिडको एग्जिबिशन सेंटर मध्ये मोफत हेअर कटिंग आणि दाडी कटिंग सुविधा
उपसमितीची बैठक संपली आहे, मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने मनोज जरांगेंना पाठवला.
न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतून नवी मुंबईत गाड्या येणार
वाशीतील सिडको , एग्जिबिशन, रेल्वे स्थानक परिसर , एपीएमसी मार्केट मध्ये वाहणं पार्क
नेरूळ , सानपाडा , सीबीडी मधील मोकळ्या मैदानावर गाड्या पार्क होणार
मराठा समन्वय समिती आणि पोलीस मुंबईतून येणाऱ्या गाड्यांची पार्किंग बघणार
Manoj Jarange Bombay High Court Hearing: कोर्टाच्या आजच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे
1) तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश
2) सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट
3) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही
4) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत
5) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार
मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली?
1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही
2) 5 हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण 500 लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही
3) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली
4) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय
कोर्टाचे सरकारला आदेश काय?
1) दुपारी तीनपर्यंत सगळं सुरळीत करा, दक्षिण मुंबई रिकामी करा
2) अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा
3) कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई करु
4) स्थानिकांना शांततेत राहू द्या, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत.
सदावर्ते यांचा युक्तिवाद सुरू
जेष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे मराठ्यांची मांडतायेत बाजू
जे काही आंदोलनकर्त्यांकडून त्रास झाला त्याची जरांगे यांच्या वतीने माफी मागतो
मात्र आमच्यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नाही
5000 लोकांची परवानगी होती मात्र केवळ 500 जणांच्या पार्किंगची सोय करण्यात आली
इतर लोक स्वतःहून आले होते
मुंबई उच्च न्यायालय-
तुम्ही लोकांना सांगितलं होतं का केवळ 5000 जणांना परवानगी आहे याची काय काळजी घेतली का मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
तुम्ही प्रेस नोट काढली का
तुम्ही मिडिया च्या माध्यमाने आव्हान केलं का की लोक जास्त झाली आहेत
मानेशिंदे-
आम्ही माध्यमांमार्फत लोकांना सांगितलं - वकिलांचा दावा
उच्च न्यायालय-
आम्ही राज्य सरकार शी देखील संतुष्ट नाही
न्यायाधिशांना पायी चालत यायची पाळी आली म्हणून आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाही
उच्च न्यायालय
त्यांनी तत्काळ जागा खाली करावी त्यांच्याकडे परवानगी नाही नाही तर आम्ही तीन वाजता आदेश देणार मुंबई उच्च न्यायालय
आंदोलनकर्त्यांना इशारा
तुम्ही जागा अडवू शकत नाही
काहीही अडचण असली तरी तुम्हाला वेळ देत आहोत राज्य आणि आंदोलनकर्त्यांना- उच्च न्यायालय
उच्च न्यायालय अशा प्रकारे घेरता येऊ शकत नाही
राज्य आणि आंदोलनकर्त्यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन होण्यासाठी कोणती पावलं उचलली
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला सवाल
काल मी विमानतळावरून परतता होतो एकही पोलिसांची गाडी रस्त्यावर नव्हती
तुमच्या पोलीस व्हॅन कुठे होत्या आम्हाला माहिती द्या
तीन वाजेपर्यंत माहिती द्या नाही तरी आम्ही कारवाई करणार
कायद्यात जे काही आहे त्यानुसार आम्ही कारवाई करणार कोर्टाच्या अवमान केला तर कारवाई करणार
आंदोलन कर्त्यांचे वकील मानेशिंदे-
आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय
स्थानिकांना शांततेत राहू द्या -मुंबई उच्च न्यायालय
लोकांच्या मनात भीतीच वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत
तीन वाजेपर्यंत आम्हाला सगळ सुरळीत हवय मुंबई उच्च न्यायालय
अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ
सुनावणी संपली
तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार
मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तात मागील 4 दिवसापासून व्यस्त असलेले पोलिस अधिकारी निमित गोयल याचा वाढदिवस पोलिस बाॅईज संघटनेकडून साजरा केला
मागील ४ दिवसापासून निमित गोयल हे मराठा आंदोलनाच्या निमित्ताने सीएसएमटी परिसरात बंदोबस्तात होते
दिवस रात्र कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुशंगाने गोयल या परिसरात स्वत: फिल्डवर होते
आज वाढ दिवसा दिवशीही सकाळपासून बंदोबस्तात व्यस्त असताना, पोलिस बाॅईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्यासह आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांनीही केक सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आणून त्याचा वाढ दिवस आॅन फिल्ड साजरा केला
मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तात मागील 4 दिवसापासून व्यस्त असलेले पोलिस अधिकारी निमित गोयल याचा वाढदिवस पोलिस बाॅईज संघटनेकडून साजरा केला
मागील ४ दिवसापासून निमित गोयल हे मराठा आंदोलनाच्या निमित्ताने सीएसएमटी परिसरात बंदोबस्तात होते
दिवस रात्र कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुशंगाने गोयल या परिसरात स्वत: फिल्डवर होते
आज वाढ दिवसा दिवशीही सकाळपासून बंदोबस्तात व्यस्त असताना, पोलिस बाॅईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्यासह आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांनीही केक सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आणून त्याचा वाढ दिवस आॅन फिल्ड साजरा केला
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी सुरू होईल.
ही सुनावणी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती शेठे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
सरकारच्या वतीने एजी डॉ. बिरेंद्र सराफ हे बाजू मांडतील.
मराठा आंदोलकांनी काल रात्री आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पोलिस परवानगी वाढवण्यासाठी अर्ज केला होता.
आज सकाळी मुंबई पोलिसांनी हा अर्ज फेटाळून लावला.
रस्ते रिकामे करणाऱ्या मराठा आंदोलकांचे म्हणणे आहे की, ते आजच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देतील.
दुसरीकडे, मराठा आंदोलकांच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे हजर राहतील.
मराठा मोर्चा मध्ये अज्ञात व्यक्ती घुसला, जो आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप आंदोलकांनी केला आहे..
हा मुलगा MP चा आहे गळ्यात भगवे उपरणं. आंदोलन कर्त्यांमध्ये घुसतोय.
पोलिसांनी अशा लोकांकडे लक्ष द्यावं. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न....
वीरेंद्र पवार -
मला आणि जरांगे पाटील यांना ही नोटीस आलेली आहे
कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत आहोत
तशा सूचना बांधवांना दिल्या आहेत
जरांगे यांनी देखील सूचना दिल्या आहेत
खाण्याच्या गाड्या वाशी येथे थांबवा .. मुंबईत आणू नका... सध्या खाण्याचा आणि पाण्याचा मोठा साठा आहे. वाशी येथे ही समान ठेवण्यासाठी सोय केली आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर
मराठा बांधवांनी हिंगोली परभणी महामार्ग रोखला
आंदोलनात मोठ्या प्रमाणात पुरुष आणि महिला सुद्धा सहभागी
रस्ता रोकोच्या दोन्हीही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा
मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून सरकार ने मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन
सरकारने आरक्षण दिलं नाही तर आंदोलन आजुन तीव्र करू समाजबांधवांच्या भावना
मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवला...
मनोज जरांगे यांच्या समर्थनात आंदोलन...
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात रास्तारोको आंदोलन...
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव आंदोलनात सहभागी...
हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक रस्त्यावर...
आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक ठप्प...
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात...
मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवला...
मनोज जरांगे यांच्या समर्थनात आंदोलन...
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात रास्तारोको आंदोलन...
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव आंदोलनात सहभागी...
हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक रस्त्यावर...
आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक ठप्प...
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात...
घास घास तोंडात घालावा, मी माझ्या समाजाला योग्य देतो दमानं देतो आयुष्य भर मिळेल असा देतो
पण पोरहो तुम्ही शांत रहा
समाजाला डाग लागेल असा करू नका
मुंबईच्या वेशीवर मराठे आहेत.. हे एवढे चतुर आहेत मराठा कसे मुंबईत येतील हे कळणार नाही... कोणीही त्यांना अडवू शकणार नाही... ते बघा कश्या मार्गाने येतील... तोपर्यंत मी जगणार नाही... पण सोमवारी होणारे आंदोलन बघा, हे फक्त देवेंद्र फडणवीस च्या चुकीने होणार आंदोलन असेल तोपर्यंत मी राहणार नाही कारण एवढे दिवस मी जगू शकणार नाही
अजूनही देवेंद्र फडणवीस च्या बाबतीत आमच्या मनात कटूचा नाही त्यांनी किती जरी त्रास दिला तरी आमच्या मनात तेवढी करतो तर त्यांच्याबद्दल नाही
मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे आणि मनोज जरंगे पाटील यांनी मराठा बांधवांना काही सूचना दिल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचे पालन मराठा बांधवांकडून होताना दिसते. मुंबईतील सीएसएमटी स्टेशनच्या समोर रस्त्यावर काल मराठा बांधवांकडून त्यांचे वाहन लावण्यात आले होते मात्र आज संपूर्ण वाहन काढून मैदानावर लावण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. या चौकात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..
मी काय उल्लंघन केलं?
रस्त्यावरच्या गाड्या काढल्या, ५ हजार लोक आझाद मैदानात ठेवले तरी तुम्ही म्हणता उल्लंघन केला?
आता हे राज्यातून लोक आलेत तुम्ही त्याना राहायला घरं द्या, मैदान द्या
फडणवीस उलट सुलट करतो
कुटील डाव खोटारडा डाव खेळतो, न्यानदेवतेला खोटी माहिती देतो
याचे परिणाम फडणवीस ला भोगावे लागतील
आमची पहिल्या दिवसापासून सरकार सोबत चर्चेची तयारी आहे
हैद्राबाद गॅजेट आणि सातारा संस्थान गॅजेट आम्हला पाहिजे त्यांचा शिंदे समितीचा अभ्यास झाला आहे
काही त्रुटी त्यांनी सांगितल्या
३० -३५ मंत्री या किंवा २ मंत्री या आम्ही चर्चेला तयार आहोत
आम्ही सन्मानाने त्त्यांच्यशी चर्चा होईल
मी मागितले ४ गॅजेट बॉंबे गव्हरेमेंट गॅजेट थोडं किचकट आहे म्हणताय..
मी कुठलाच मुद्दा मागे राहू देत नाही
चंद्र सूर्य असेपर्यत टिकेल असा आरक्षण मला हवाय...
आम्ही आज नाही तर २२ वर्षांपासून लोकशाही मार्गने कायद्याच्या चौकटीत राहून काम करतो आंदोलन करतो
न्यायदेवतेना आम्हाला आतापर्यत न्यायला दिला
आम्हांला विश्वास आहे, गोरगरिबांच्या मागणीसाठी न्याय करेल
गोरगरिबांचा आधार हे न्यायमंदिर आहे
न्यायदेवता आमचा न्याय करणार, आमच्या वेदना न्यायदेवता जाणून घेईल
न्यायालय एका शब्दांनुसार आम्ही कुठेही मुंबईत ट्रॅफिक केली नाही
यापेक्षा अजून काय पालन करायला पाहिजे
पुढेही न्यायदेवता म्हणेल तसाच पालन करत राहणार
विषय आता सरकारचा
सरकार आणि फडणवीस यांना सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅजेट याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई आम्ही सोडणार नाही
मराठा आणि कुणबी एकच या शासन निर्णय शिवाय मुंबई सोडणार नाही
सगेसोयरे अंमलबाजवानी मध्ये काय अडचणी आहे ते आम्हाला सांगा
आता पर्यत ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत... आता या नोंदी ग्रामपंचायत ला चिटकवून तातडीने प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे
देवस्थान चे दस्तवेज शोधले गेले नाही ते शोधले गेले पाहिजे
पोलीस पाटील रेकॉर्ड शोधणे गरजेचं आहे
हे काम शिंदे समिती ने करावं
शिंदे समितीला स्वतंत्र कार्यालय द्यावं
मोडी लिपी समजणारे अभ्यासक त्यांना द्यावे
फडणवीस साहेब आम्ही शांत आहेत शांत राहू द्या
शनिवार रविवार जर मराठे मुंबईत आले तर सोमवार चा आंदोलन खूप चांगला होईल
१०० पोलीस आले तरी जेल ला नेतील आणि १लाख आले तरी जेल ला नेतील
आम्ही जेल मध्ये आंदोलन करू
आम्ही शांत आहोत शांततेत मार्ग काढून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा...सन्मान केला तर फडणवीस तुम्हला गरीब लोक कधी विसरणार नाही
जर तुम्ही अपमानित केलं तर त्यांच्या डोक्यात बदल्याची भावना राहील
मी मेलो तरी आझाद मैदानतून हटत नाही, मी कुठल्याही टोकाला जायला तयार आहे
मराठे साडे तीनशे वर्षानंतर तुम्हाला कळेल काय आहे ते
किती माझी तब्येत खराब झाली तरी शांत राहायचा
कितीही त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचाच
मी मेल्यानंतर सुद्धा शांत रहा, ही लढाई शांततेत लढायची आहे
मी देवेंद्र फडणवीस ला सांगतो मी मरेपर्यत मुंबई आता सोडणार नाही
आता तुम्ही कारण देऊ नका
मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, वाडी बंदर परिसरात असलेल्या गाड्या काढण्यास सुरुवात
पूर्व मुक्त मार्गाच्या खाली असलेल्या रोडवरील मराठा आंदोलकांच्या गाड्या दुसरीकडे पाठवण्यास सुरुवात
मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करून न्यायालयाच्या देशाचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे
पोलिसांच्या विनंतीमुळे ऑरेंज गेट, वाडी बंदर, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग, बी पी टी रोड परिसर मोकळा होण्यास सुरुवात
याच परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क करून थांबले होते मात्र आता हळू हळू आंदोलक एथून निघत आहेत
त्यामुळे माल वाहतूक पुन्हा सुरू, टँकर कंटेनर पुन्हा सुरू, मुंबई पोर्ट मध्ये जाणारी माल वाहतूक सुरू, बीपी एच पी कंपनीत जाणारी टँकर वाहतूक सुरू, खासगी वाहतूक देखील पूर्ववत
मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, वाडी बंदर परिसरात असलेल्या गाड्या काढण्यास सुरुवात
पूर्व मुक्त मार्गाच्या खाली असलेल्या रोडवरील मराठा आंदोलकांच्या गाड्या दुसरीकडे पाठवण्यास सुरुवात
मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करून न्यायालयाच्या देशाचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे
पोलिसांच्या विनंतीमुळे ऑरेंज गेट, वाडी बंदर, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग, बी पी टी रोड परिसर मोकळा होण्यास सुरुवात
याच परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क करून थांबले होते मात्र आता हळू हळू आंदोलक एथून निघत आहेत
त्यामुळे माल वाहतूक पुन्हा सुरू, टँकर कंटेनर पुन्हा सुरू, मुंबई पोर्ट मध्ये जाणारी माल वाहतूक सुरू, बीपी एच पी कंपनीत जाणारी टँकर वाहतूक सुरू, खासगी वाहतूक देखील पूर्ववत
वकील आशिष गायकवाड हे जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहेत... कोर्टात आज पुन्हा सुनावणी आहे
विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा विखे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल
मनोजकुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्रच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांच्या भेटीला
उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार, त्यापार्श्वभूमीवर भेटीला आल्याची माहिती
कृत्रिम पायाचा आधार घेत मागील पाच दिवसापासून आंदोलनात सहभागी असलेला परभणीचा मराठा आंदोलन जरांगे पाटलाच्या पायथ्याशी येऊन रडला
कुठल्या स्थितीत आरक्षण मिळावं त्याचा फायदा माझ्या मुलांना होईल, यासाठी सगळा त्रास सहन करून आपण परभणीहून आल्याचं बालाजी कदम यांनी सांगितलं...
किती त्रास झाला तरी मुंबई सोडणार नसल्याचा त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं.
- गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना सोशल मिडियावरुन शिवीगाळ
- ‘आम्ही धाराशिवकर’ या फेसबुक पेजवरुन पंकज भोयर यांना आई- बहिणीवरुन शिवीगाळ
- जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवतं? याची नावं जाहिर करण्याचा पंकज भोयर यांनी दिला होता इशारा
- शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात पंकज भोयर पोलीस तक्रार करण्याची शक्यता
- गेल्या काही दिवसांत पंकज भोयर ओबीसींची बाजू मांडत असल्याने त्यांना शिवीगाळ केल्याची माहिती
- गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना सोशल मिडियावरुन शिवीगाळ
- ‘आम्ही धाराशिवकर’ या फेसबुक पेजवरुन पंकज भोयर यांना आई- बहिणीवरुन शिवीगाळ
- जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवतं? याची नावं जाहिर करण्याचा पंकज भोयर यांनी दिला होता इशारा
- शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात पंकज भोयर पोलीस तक्रार करण्याची शक्यता
- गेल्या काही दिवसांत पंकज भोयर ओबीसींची बाजू मांडत असल्याने त्यांना शिवीगाळ केल्याची माहिती
नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देवू नये , मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून नये ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे.
सरकारकडून लेखी आश्वासन देत नाही तेव्हापर्यन्त आंदोलन सुरु राहील अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका...
मराठा आरक्षणाला घेऊन सरकारचा काय नवीन मसुदा असेल तो आल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपली भूमिका स्पष्ट करेल, मात्र सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकार वारंवार सांगत असल्याने आम्ही सरकारच्या आश्वासनाबद्दल आश्वस्त असल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
हैद्राबाद गॅजेट व सातारा गॅजेट मध्ये वैयक्तिक महसुली व शैक्षणिक कागदपत्रात कुणबी नोंदी असेल तर त्यासाठी नवीन कायदयाची गरज नाही. मात्र सरकार काय मसुदा आणते त्याकडे आमचे बारीक लक्ष असणार असणार बबनराव तायवाडे म्हणाले.
उपसमितीच्या आजच्या बैठकीत अंतिम मसुदा आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर खलबतं
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा जीआर काढण्याच्या तयारीत
जीआरचा मसुदा तयार, महाधिवक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर उपसमितीला दाखवला जाणार
बैठकीसाठी इतर मागासवर्गीय विभागाचे सचिव यांची देखील उपस्थिती असणार
मसुद्याच्या अंतिम मान्यतेनंतर मनोज जरांगेंकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार
दरम्यान, दुसरीकडे उच्च न्यायालयाला यासंदर्भात अवगत केले जाणार, सूत्रांची माहिती
न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी बजवली नोटीस
आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे
आझाद मैदान पोलिसांन जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे
तसेच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तवयाचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे
मराठा आंदोलनात मोठ्या संख्येने राज्यभरातील शेतकरी सहभागी झाल्यानंतर शेतातील माल हा शेतातच पडून असल्याने आवक ही कमी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात भाज्यांचे दर सुद्धा वाढलेले आहेत, शिवाय वाहतूक कोंडीमुळे सुद्धा मोठा परिणाम मार्केटमध्ये जाणवत असल्याचं विक्रेत्यांचे म्हणणं आहे. जोपर्यंत मराठा आंदोलन मागे घेतले जात नाही आणि शेतकरी शेतात जात नाहीत तोपर्यंत असाच परिणाम जाणवत राहील असं विक्रेत्यांचे म्हणणं आहे. जवळपास 40% आवक ही कमी झाली आहे. भायखळा भाजी मार्केट मधून याचा आढावा घेतलाय.
मानखुर्द जकात नाक्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरवात
नाकाबंदी केल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू
नवी मुंबई पोलिसांनी नाका बंदी न केल्याने याचा फटका मुंबईच्या वेशीवर
सीबीडी , नेरूळ , सानपाडा , येथे नाकाबंदी करून तिथेच मराठा आंदोलकांच्या गाड्या आडवल्या तर मुंबईच्या वेशीवर याचा ताण येणार नाही
नवी मुंबई पोलीसांनी नियोजन न केल्याने मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत भर
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकांवर आज पुन्हा सुनावणी
दुपारी एक वाजता नियमित खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता
आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष
दुपारी १२ वाजेपर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाण खाली होतील याची मनोज जरांगे पाटील आणि इतरांनी खात्री करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबईत नव्याने आंदोलकांना प्रवेश न देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते आदेश
राज्य सरकारने घातलेल्या अटी शर्तींच उल्लंघन झाल्याने तसेच आंदोलनाला कोणतीही परवानगी नसल्याने नियमानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारला दिले होते निर्देश
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश मिळू दे यासाठी मराठा बांधवांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाला अभिषेक घालून साकडे मागितले आहे. यावेळी शेकडो मराठा बांधव शिखर शिंगणापूर येथे उपस्थित होते. यावेळी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला. नंतर मराठा बांधवांनी शंभू महादेवाला साकडे घालत मराठा समाजाला न्याय मिळावा त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी साकडे देखील घातले.
सकाळच्या वेळी दक्षिण मुंबईत जाणाऱ्या नोकरदाराची संख्या मोठी असते. सीएसटी स्थानकात उतरल्यानंतर त्यांना आंदोलकांमुळे बाहेर पडताना अडचण होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांची आणि दंगल नियंत्रण पथकाची एक टीम स्थानकात तैनात करण्यात आली आहे.
मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल
जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून पहिला गुन्हा दाखल
रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये झाली होती तुफान हाणामारी
हाणामारीत बसच्या काचा फोडण्यात आल्या होत्या
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून दखल घेत गुन्हा दाखल
नवी मुंबईतील सायन - पनवेल हायवे वरील वाहतूक सुरळीत
मानखुर्द जकात नाक्यावर
मध्ये मुंबई पोलीसांकडून नाका बंदी
मराठा आंदोलक यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. जेवणाची गाडी सोडली जाते. कार्यकर्त्यांना परत नवी मुंबईत पाठवले जात आहे.
एपीएमसी मार्केट सुरळीत सुरू आहे.
भाजीपाला मुंबईत पोचत आहे
आझाद मैदानात मोठी गर्दी झाली आहे, हलगी वाजवून नाच सुरू आहे जरांगे पाटील यांचे दोन मोठे झेंडे आणले आहेत.
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मुंबईत लागले बॅनर्स, मराठा आंदोलकांना महत्त्वाच्या सूचनामुंबईत लागले बॅनर्स, मराठा आंदोलकांना महत्त्वाच्या सूचना
कालच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात रहदारी दिसून येत आहे, न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईकर ठाणेकर घराबाहेर पडताना दिसत आहेत. खासगी वाहने घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लोकांची संख्या आज जास्त आहे. कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसेस देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यात प्रवासी देखील जास्त आहेत. रिक्षा, टॅक्सी, ओला उबेर सारखी वाहने आज प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत
मुंबईकडे येणाऱ्या ज्या ट्रकमध्ये खाण्याचे साहित्य आहे त्यांना पोलिसांकडून मुंबईत सोडले जात आहे. तर ज्यात केवळ आंदोलक आहेत, त्यांना वाशी पार्किंगकडे जाण्यास सांगितले जात आहे
मराठा आंदोलकांकडून सीएसएमटी परिसरातून वाहने काढण्यास सुरूवात. सर्व वाहने नवी मुंबई एपीएमसी या ठिकाणी हलवणाच्या सूचना
ठाणे टोलनाका इथे पोलिसांची नाका बंदी
कालप्रमाणेच आजही पोलीस मराठा आंदोलनाच्या गाड्यांची चौकशी करत आहेत
मात्र मुंबईत प्रवेश दिला जात आहे
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या परिसरातील मराठा आंदोलकांचे टेम्पो आणि इतर गाड्या आता मुंबई पोलिसांनी हटवल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता मोकळा झाला आहे. या मराठा आंदोलकांना नवी मुंबईत जाण्यास सांगण्यात आले आहे. या परिसराची साफसफाई सुरु आहे.
आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.
या कामासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.
या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येत आहे. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जात आहे. लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्ववपदावर आणण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. याशिवाय सखोल स्वच्छता करण्यासाठी कामगारांचीसुद्धा मदत घेण्यात येत आहे.
न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांच्या उभ्या गाड्या पोलिसांनी काढायला सुरुवात केली. तसेच हा परिसर पालिकेच्यावतीने स्वच्छ करण्यास हि सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी स्पीकरच्या मदतीने आणि प्रत्यक्ष भेटून वाहने मुंबईच्या बाहेर वाशी मार्केटला नेण्यास सांगितली
मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची कालची चौथी रात्र होती. त्यात न्यायालयाने निर्देश दिले असले तरी आंदोलक मात्र या परिसरातून कमी झाले नाहीया चौथ्या रात्रीदेखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शेकडो च्या संख्येने आंदोलक झोपले होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ, जेवण , फळे आणि पाणी आझाद मैदानात येत आहे. यात अन्नाची नासाडी देखील होत होती, हे रोखण्यासाठी आता आझाद मैदानात आंदोलकांकडून एक गोदाम तयार करण्यात आले आहे. इथे ज्यांना वस्तू द्यायच्या आहेत किंवा हव्या आहेत याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आता मुख्यतः सुके खाद्यपदार्थ आणण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Manoj Jarange Maratha Reservation LIVE: मोठी बातमी! कोर्टाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब, मनोज जरांगे पाटलांना तात्पुरता दिलासा